गांधीनगर- गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. या पोलीस अधिकाऱ्याने काही भाजी विक्रेत्यांचे गाडी पलटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर गुजरातचे पोलीस महासंचालक शिवानंद झा यांनी या अधिकाऱ्याला निलंबित केले.
व्ही. के. चौधरी असे या निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. अहमदाबादच्या कृष्णनगर परिसरात काही पोलीस अधिकारी भाजीविक्रेत्यांना दमदाटी करत होते. तसेच या विक्रेत्यांचे गाडेही त्यांनी पलटले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. या विक्रेत्यांना पोलीस काठीने मारहाण करताही या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. झा यांनी या अधिकाऱ्याचे निलंबन करतानाच इतर पोलिसांनाही लोकांशी नीट वागण्याचे निर्देश दिले आहेत.