जौनपूर -उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील सुजानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात शौचास गेलेल्या महिलेवर अॅसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाने तिच्या गुप्तांगावर अॅसिड हल्ला केला.
अॅसिड हल्ला होताच संबंधित महिलेने आरडाओरड केली. यानंतर परिसरातील लोक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोवर आरोपी फरार झाला होता. येथे जमलेल्या नागरिकांनी पीडितेस रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू करण्यात आहे.
जौनपूर : शौचास गेलेल्या महिलेच्या गुप्तांगावर अॅसिड हल्ला ही महिला शौचास गेली असता येथे आधीपासूनच दबा धरून बसलेल्या एका तरुणाने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने विरोध केल्यानंतर त्याने तिच्या गुप्तांगावर अॅसिड हल्ला केला. घटनेची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलीस अधीक्षक विपिन कुमार मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार सुजानगंज पोलीस ठाणे परिसरात शौचास गेलेल्या संबंधित महिलेच्या गुप्तांगावर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी चमू तयार करण्यात आला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.