नवी दिल्ली- येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमान तळावर तपासणी दरम्यान सीआईएसएफ पोलिसांच्या हाती एका व्यक्तीकडे विना परवाना बंदूक सापडली आहे. बंदुकधारी आरोपी मंबईकडे जाणार होता. प्रज्वल व्ही तिवारी असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीकडे बंदुकीची कागदपत्रे मागितली मात्र त्याच्याकडे कागदपत्र नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
दिल्ली विमानतळावर प्रवाशाकडे आढळली बंदुक, मुंबईला जाण्यापूर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात
इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमान तळावर तपासणी दरम्यान सीआईएसएफ पोलिसांना एका व्यक्तीकडे अवैध बंदुक सापडली आहे. आरोपी येथून मंबईकडे जाणार होता.
दिल्ली विमानतळावर लोडेड मैग्जीनसह आरोपी अटकेत जात होता मुंबईला
याबाबत सीआईएसएफचे प्रवक्ते हेमेंद्र सिंह यांनी सांगितले की, आरोपी हा एयर एशियाच्या विमान नंबर 15- 332 ने दिल्ली विमानतळावरून मुंबईला जाणार होता. त्या दरम्यान आरोपी प्रज्वल तिवारी हा एक्सरे मशीनसमोर चेकिंगसाठी आला असता, त्याच्याकडील बँगेवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी बँगेची झडती घेतली त्यात 8 राउंड असलेली एक बंदुक सापडली. ती 7.65 एमएम कैलिबरची आहे. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.