पणजी -गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक, हे जम्मू आणि काश्मिरमधील आपल्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहिणार आहेत. तसेच, कलम ३७० हटवले जाऊन, दोन नवीन केंद्रशासित प्रदेश तयार होण्याबाबतही यामध्ये ते लिहिणार आहेत. ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ यादरम्यान ते दिल्लीचे राज्यपाल होते.
एका स्थानिक वाहिनीला याबाबत दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की जम्मू आणि काश्मिरमध्ये झालेल्या आंदोलनांमध्ये एकाही मौलवी, प्राध्यापक, अधिकारी वा राजकारण्याच्या मुलाचा मृत्यू झाला नाही. याचाच अर्थ परिस्थिती नियंत्रणात होती. ते पुढे म्हणाले, की फारूख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती या नेत्यांच्या विचारांचे जम्मू आणि काश्मिरमध्ये अस्तित्व उरले नाही.