नवी दिल्ली - स्त्यावरील वाहतूक आणि सुरक्षितता हा विषय आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. चुकीच्या बाजूने येत असलेल्या बसच्या समोर एक महिला आपली दुचाकी घेऊन धीटपणे उभा असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
बॉस लेडी! चुकीच्या बाजूने येणाऱ्या बसला जिगरबाज महिलेने अडवले, पाहा व्हिडिओ - bus driving in wrong lane
सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. चुकीच्या बाजूने येत असलेल्या बसच्या समोर एक महिला आपली दुचाकी घेऊन धीटपणे उभा असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

संबधीत व्हिडिओ केरळ राज्यामधील आहे. एक महिला रस्त्याच्या उजव्या बाजूने उभा असून त्या महिलेसमोर एक बस चुकीच्या बाजूने येत आहे. वाहतूक नियमानुसार महिला बरोबर आहे. त्यामुळे मोठी बस समोरून येत असतानाही महिला जागीच थाबल्याचे व्हिडिओमध्ये पाहायाल मिळत आहे. दरम्यान हा व्हिडिओ कधीचा आणि कोणत्या शहरामधील आहे. याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.
एका व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या टि्वटरवर शेअर केला आहे. जेव्हा तुम्ही बरोबर असता. त्यावेळी तुमच्याकडे एक वेगळीच शक्ती असते. येथे एक महिलाने चुकीच्या बाजूने बस चालवणाऱया चालकाला धडा शिकवला आहे, असे त्या व्यक्तीने टि्वटमध्ये म्हटले आहे. याचबरोबर या व्हिडिओला नेटेकऱ्यांनी पंसती दिली असून महिलेचे कौतूक केले आहे.