श्रीनगर- हमीरपुरच्या पोलीस लाईन कँटीनमध्ये एक संदेश लिहण्यात आला आहे. हे वाक्य पाहिल्यानंतर पहिल्यांदा कोणाताही व्यक्ती थोडासा चक्रावून जातो. कारण, या ठिकाणी 'कश्मीरची समस्या सोडविली जात नाही, तोपर्यंत उधारी बंद आहे', असे स्लोगन लिहण्यात आले आहे. त्यामुळे हे वाक्य पाहिल्यानंतर प्रत्येकजण पहिल्यांदा थोडेसे स्मितहास्य करतात.
'कश्मीरची समस्या सोडविली जात नाही, तोपर्यंत उधारी बंद'
या स्लोगन लिहलेल्या तरुणाचे नाव अनुज आहे. त्याची सैन्यात जाण्याची जाण्याची इच्छा होती.
त्यामुळे इटीव्ही भारतने या संदेश लिहणाऱ्याला भेटण्याचे ठरवले. या स्लोगन लिहलेल्या तरुणाचे नाव अनुज आहे. त्याची सैन्यात जाण्याची जाण्याची इच्छा होती आणि भारतातील प्रत्येकाला वाटते की, काश्मीर समस्या सोडवली पाहिजे. मात्र, मी सैन्यात शकलो नाही, म्हणून मी काम करतो त्या ठिकाणी मनातील हा संदेश भिंतीवर लिहिला, असल्याचे अनुजने सांगितले.
त्याबरोबरच या व्यक्तीचा भाऊ सैन्यात आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये आजही तरुण देशासाठी जीव देण्यासाठी तयार आहेत, हे पाहून आम्हला मोठा आनंद झाल्याचे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी सांगितले.