नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने सोने तस्करी करणाऱ्या टोळीच्या १ जणास अटक केली आहे. या आरोपी जवळ ७२ लाखाचे सोने सापडले आहे.
सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमरदीप सिंह यांनी सांगितले, की विमान क्रमांक एआय-९१६ दुबई वरुन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल ३ वर आले. यावेळी ग्रीन चॅनलमध्ये तपासणीदरम्यान एका व्यक्तीबाबत संशय आला. त्यामुळे त्याला तपासणीसाठी नेण्यात आले. त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यात लोखडांच्या एका पार्टमध्ये सोन्याचा रोड लपवण्यात आला होता. या सोन्याचे वजन २ किलो ३१४ ग्रॅम असून भारतीय बाजारपेठेत याची किंमत ७२ लाख ५० हजार रुपये आहे.