महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 7, 2020, 7:24 PM IST

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशात सुमारे 61 हजार संभाव्य कोरोनाग्रस्त निगराणीखाली - योगी आदित्यनाथ

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अडीचशेपेक्षा जास्त विविध धर्माच्या प्रमुखांशी बैठक घेतली. राज्यामध्ये कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये, तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी धर्मप्रमुखांना केले.

योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ

लखनौ- उत्तर प्रदेशात 61 हजार 500 नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तर 438 जणांना विलगीकरण कक्षात भर्ती करण्यात आले आहे. 4 हजारांपेक्षा जास्त जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.

राज्यामध्ये 25 कोरोनाचे रुग्ण बरे झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अडीचशे पेक्षा जास्त विविध धर्माच्या प्रमुखांशी बैठक घेतली. राज्यामध्ये कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये, तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी धर्मप्रमुखांना केले. दिल्लीतीत तबलिगी जमात कार्यक्रमानंतर देशातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे सर्व राज्य सरकारे सतर्क झाली आहेत.

उत्तर प्रदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या 324 झाली असून आज 16 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील 37 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. 168 रुग्ण तबलिगी कार्यक्रमाशी संबंधित आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details