नवी दिल्ली -देशातील मतदार सोमवारी पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करणार आहे. दरम्यान देशातील ७ राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. उद्या येथील ८ कोटी ७६ लाख मतदार आपला मताधिकार बजवणार आहेत. उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर एक नजर....
लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात एकूण ५१ लोकसभा मतदार संघामध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी सातही राज्यात जवळपास ९६ हजार ८८ मतदान केंद्रांची उभारणी निवडणूक आयोगाने केली आहे. या राज्यातून ४ कोटी ६३ लाख पुरुष आणि ४ कोटी १३ लाखच्या जवळपास महिला मतदान करतील. एवढेच नाही तर एकूण मतदारांमध्ये २ हजार २१४ मतदार हे तृतीयपंथी आहेत.