तिरुवअनंतपुरम : गेल्या दोन आठवड्यांमध्ये केरळच्या कण्णूरमधील तब्बल ५२ सीआयएसएफ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, सर्व जवानांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून, त्यांच्या देखरेखीसाठी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा अभ्यास करण्यासाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला नेमण्यात आले आहे.
यासोबतच, केरळच्या वलियावेलिचम येथील सीआयएसएफ जवानांच्या कॅम्पमध्येही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर राबवण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. या कॅम्पमध्ये २००हून अधिक जवान राहतात. या सर्वांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मंगळवारपर्यंत तपासण्यात आलेल्या ९८ पैकी ५२ जवानांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली.