महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतात अडकलेले 425 ऑस्ट्रेलियन नागरिक मायदेशी रवाना

ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तालयाचे भारतात अडकलेल्या नागरिकांना माघारी नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यानुसार जेटी 2846 या विशेष विमानाने त्यांना आज नेण्यात येत आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 16, 2020, 4:49 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनचा पहिला टप्पाही 14 एप्रिलला पूर्ण झाला, तेव्हापासून अनेक परदेशी नागरिक भारतामध्ये अडकून पडले आहेत. आज भारतात अडकून पडलेले 425 ऑस्ट्रेलियन नागरिक मायदेशी रवाना झाले आहेत.

ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तालयाचे भारतात अडकलेल्या नागरिकांना माघारी नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यानुसार जेटी 2846 या विषेश विमानाने सर्वजण माघारी जात आहेत. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने मेलबर्नला जाण्यासाठी उड्डान घेतले.

भारातमध्ये कोरोनाचे रुग्ण 13 हजार 380 झाले आहेत. यातील 1 हजार 489 जण पूर्णत बरे झाले आहेत. तर 414 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांमधील 10 हजार 477 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने भारतात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक परदेशी नागरिक भारतात अडकून पडले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details