लखनऊ - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी पोलीस, आरोग्यविभाग आणि महानगरपालिकेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. उत्तर प्रदेशातील हरडोई जिल्ह्यात जंतूनाशक फवारणी करताना एका ४० वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशात जंतूनाशक फवारणी करताना सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, आरोग्यविभाग आणि महानगरपालिकेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. उत्तर प्रदेशातील हरडोई जिल्ह्यात जंतूनाशक फवारणी करताना एका ४० वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
राजेश कुमार असे या मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बीलगाम येथील लक्ष्मीपुरा भागात पालिकेच्यावतीने जंतूनाशक फवारणी करण्यासाठी त्याची नेमणूक करण्यात आली होती. जंतूनाशक फवारणी करताना राजेश कुमार अचानक बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखले केले गेले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राजेश कुमार यांचे कुटुंबिय आणि सहकाऱयांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. कोरोनासाठी जंतूनाशक फवारणी करणाऱया आणि सफाई कर्मचाऱयांना सुरक्षेची साधने मिळत नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. मृत राजेश यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.