तिरुअनंतपुरम - विझिंजम तटावरुन बेपत्ता झालेल्या ७ पैकी ४ मच्छीमार किनाऱ्यावर सुखरुप परतले आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. हे मच्छीमार शुक्रवारी खोल समुद्रात गेले होते. समुद्राच्या तीव्र लाटांमुळे त्यांच्या नावेतील इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे ते किनाऱ्यावर पोहचू शकले नाहीत. इंजिन दुरुस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरूच ठेवला होता, शनिवारी सकाळी इंजिन सुरू झाल्याने तटावर सुखरूप परतले.
केरळमधील बेपत्ता ७ पैकी ४ मच्छीमार किनाऱ्यावर सुखरुप परतले
विझिंजम तटावरुन बेपत्ता झालेल्या ७ पैकी ४ मच्छीमार किनाऱ्यावर सुखरुप परतले आहेत.
विझिंजम तट
शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी नैऋत्य पावसामुळे तयार झालेल्या तीव्र लाटांचा मोठा प्रभाव या भागात पाहण्यास मिळाला. यामुळे या मच्छीमाराच्या कुटुंबीयांनी मच्छीमारांच्या बेपत्ता असल्याची नोंद केली होती.
कोलम (जि. निंदखरा) येथील ३ मच्छीमार अजूनही बेपत्ता असून शनिवारी केरळमधील स्थानिक हवामान संस्थांनी या भागात येणाऱ्या काही दिवसात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांना दक्षतेचे संकेत दिले आहेत.