सहारनपूर (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे स्थानिक प्रशासनाने महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या चार तबलिगी जमातीच्या व्यक्तींना ताब्यात घेतले होते. त्यांना फतेहपूर येथील कोविड-19 साठीच्या रुग्णालयात क्वारन्टाईन करून ठेवण्यात आले होते. ते चौघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीत आढळले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण 28 जणांना देवबंद येथे क्वारन्टाईन केले आहे.
यूपीमध्ये क्वारन्टाईन केलेले महाराष्ट्रातील 'तबलिगी' कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कातील 28 जणांचे विलगीकरण
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे स्थानिक प्रशासनाने महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या चार तबलिघी जमातीच्या व्यक्तींना ताब्यात घेतले होते. ते चौघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीत आढळले आहे. यामुळे प्रशासन हादरले आहे.
सहारनपूर
तबलिघी जमातीशी संबंधित चौघांना काही दिवसांपूर्वी क्वारन्टाईन करण्यात आले होते. हे चौघेही कोरोना विषाणू संक्रमित आढळल्याने स्थानिक प्रशासन हादरले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 28 जणांना प्रशासनाने देवबंद येथील जामिया तिब्बिया रुग्णालयात क्वारन्टाईन केले आहे. हे जमाती ज्या परिसरात राहत होते, तो परिसर सील केल्याचे पोलीस अधीक्षक विद्यासागर मिश्र यांनी सांगितले आहे. त्यांनी लोकांना घरातून बाहेर न पडण्याविषयी आवाहनही केले आहे.