लखनौ - बांगलादेशमध्ये अडकलेल्या ३५ भारतीयांना काल(शनिवार) विमानाने भारतात आणण्यात आले. उत्तरप्रदेशातील गाझीयाबाद येथे एअर इंडियाची फ्लाईट उतरली. सीमा परिसरातील नागरिकांच्या विरोधामुळे भारत बांगलादेशातील रस्ते वाहतूक मागील काही दिवसांपासून खोळंबली आहे. पश्चिम बंगालमधील काही स्थानिक नागरिकांनी भारत बांगलादेश वाहतुकीस विरोध केल्यानंतर सर्व प्रकारची वाहतून ठप्प आहे.
भारतात माघारी आणलेल्या सर्वांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तात्पुरते त्यांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथून त्यांना घरी जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांना घरी पोहचविण्यासाठी गाझियाबादचे जिल्हाधिकारी शंकर पांडे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.