तिरुवअनंतपुरम (केरळ) -केरळमध्ये हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हा विषय समाज माध्यमावर बुधवारी दिवसभर चर्चेत होता. मात्र, केरळमधूनच एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. दोन वर्षाच्या भामा या मुलीची उमा देवी या हत्तीणीसोबत चांगलीच गट्टी जमली आहे. पाऊस सुरू असताना, त्या दोघीही पावसात भिजत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ आता समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत.
भामा आणि उमा... केरळमध्ये दोन वर्षांच्या चिमुकलीची हत्तीणीसोबत मैत्री
केरळमध्ये हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हा विषय समाज माध्यमावर काल दिवसभर चर्चेत होता. मात्र, केरळमधूनच एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. दोन वर्षाच्या भामा या मुलीची उमा देवी या हत्तीणीसोबत चांगलीच गट्टी जमली आहे.
भामा ही महेश या हत्तीची काळजी घेणाऱ्या माहुताची मुलगी आहे. माझ्या दोन वर्षांच्या भामाची आणि सहा महिन्यांच्या उमा देवी या हत्तीणीची मैत्री असल्याचे महेश म्हणाले.
केरळमधील सायलेंट व्हॅली फॉरेस्टमध्ये मानवाच्या क्रुरतेमुळे एका हत्तीणीला आपला जीव गमवावा लागला. मानवी वसाहतीमध्ये ती हत्तीण आली असता पेटते फटाके अननस फळातून कोणीतीरी जाणूनबुजून तिला खायला दिले. अननस खाताच मोठा स्फोट झाला, त्यामध्ये तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने तिला खातापिता येत नव्हते, त्यामुळे हत्तीण मरण पावली. ही हत्तीण गर्भवती असल्याची माहितीही वनअधिकाऱ्यांनी दिली.