महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'ऑड-इव्हन'ला मिळाला चांगला प्रतिसाद; पहिल्या दिवशी २३३ जणांना दंड

दिल्ली वाहतूक पोलीस, आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात एकूण २३३ जणांना हा नियम तोडल्याबद्दल दंड बसला आहे. लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे दिल्ली सरकार समाधानी आहे.

1st day of odd-even scheme highly successful

By

Published : Nov 4, 2019, 10:34 PM IST

नवी दिल्ली - केजरीवाल सरकारने आपल्या बहुचर्चित 'ऑड-इव्हन' नियमांना आजपासून पुन्हा लागू केले आहे. पहिल्या दिवशी लोकांकडून या फॉर्म्युल्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दिल्ली वाहतूक पोलीस आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात एकूण २३३ जणांना हा नियम तोडल्याबद्दल दंड बसला आहे. लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे दिल्ली सरकार समाधानी आहे.

दरम्यान, दिल्लीपाठोपाठ उत्तर प्रदेशचे योगी सरकारही राज्यातील ठराविक शहरांमध्ये ऑड-इव्हन नियम लागू करणार आहे. उत्तर प्रदेशचे वन आणि पर्यावरण मंत्री दारा सिंह चौहान यांनी ही माहिती दिली. तसेच, बिहार सरकारही प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, राजधानी पटनामध्ये काही नवीन नियम लागू करणार आहे.

हेही वाचा : दिल्लीनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही लागू होणार 'ऑड-इव्हन'..

ABOUT THE AUTHOR

...view details