दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजघाटवर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली..
महात्मा गांधींची १५१वी जयंती : जगभरातून वाहिली जातेय आदरांजली
10:00 October 02
केजरीवाल यांनी राजघाटवर वाहिली आदरांजली..
09:57 October 02
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी)ने वाहिली अनोखी आदरांजली..
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी)ने महात्मा गांधींना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. या पोलिसांच्या बँड पथकाने गांधी स्मृती स्थळावर "रघुपती राघव राजा राम" हे गांधींचे प्रसिद्ध भजन वाजवत त्यांना आदरांजली वाहिली.
09:29 October 02
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरुन गांधीजींना आदरांजली वाहिली आहे..
09:29 October 02
गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विट करत महात्मा गांधींना आदरांजली वाहिली..
09:28 October 02
काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्विटरवरुन गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत..
07:51 October 02
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजकडून गांधींना आदरांजली
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेट्विजनेही महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधींनी मानवी इतिहासात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक लोक प्रेरित झाले आहेत, असे मत टॉम सुओझ्झी यांनी व्यक्त केले.
07:48 October 02
लाल बहादुर शास्त्रींच्या मुलांनी वाहिली गांधींना आदरांजली
देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे पुत्र सुनील शास्त्री आणि अनिल शास्त्री यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
07:47 October 02
पंतप्रधान मोदींनी राजघाटवर वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर जात, महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
07:43 October 02
महात्मा गांधींची १५१वी जयंती : जगभरातून वाहिली जातेय आदरांजली
राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज १५१वी जयंती आहे. यानिमित्ताने जगभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.
मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या ठिकाणी झाला होता. दरवर्षी 2 ऑक्टोबर भारतात गांधी जयंती साजरा केली जाते तर 2 ऑक्टोबर रोजी जागतिक अहिंसा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ उपाधी देण्यात आली. गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला.