महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bharat Jodo Yatra Today : काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेला स्थानिकांचा मोठा पाठिंबा, यात्रेचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचे काश्मीरमधील जनतेने मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. शनिवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेत त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) प्रमुख मेहबूबा मुफ्ती देखील सामील झाल्या होत्या.

Bharat Jodo Yatra Today
भारत जोडो यात्रा

By

Published : Jan 29, 2023, 11:39 AM IST

श्रीनगर : राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' आता शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. कन्याकुमारी हून निघालेल्या भारत जोडो यात्रा सध्या काश्मीर खोऱ्यात आहे. या यात्रेला खोऱ्यातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. 27 जानेवारीला यात्रेने नवयुग बोगदा पार करून काश्मीर खोऱ्यात प्रवेश केल्यानंतर मोठ्या संख्येने लोकांनी राहुल गांधींचे स्वागत केले. भारत जोडो यात्रा चेरसू येथून पुढे निघाली तेव्हा महिला, लहान मुले आणि वृद्धांसह अनेक स्थानिक लोकही श्रीनगरच्या दिशेने मेगा वॉकथॉनमध्ये त्यांच्यासोबत चालताना दिसले.

यात्रेत दूरवरून महिला आल्या : ईटीव्ही भारतशी बोलताना स्थानिक वृद्ध महिलांनी सांगितले की, त्या राहुल गांधींना पाहण्यासाठी लांबून आल्या आहेत. राहुल गांधींची एक झलक पाहण्यासाठी त्या आतुर आहेत. महिलांनी सांगितले की, राहुल गांधींकडून त्यांना खूप आशा आहेत. ते काश्मीर खोऱ्यातील समस्यांवर तोडगा काढतील. त्या म्हणाल्या की, सध्याच्या सरकारला मी कंटाळले आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून खोऱ्यातील जनता दडपशाही, शोषण, महागाई, बेरोजगारी अशा समस्यांना तोंड देत आहे. आता सरकार त्यांच्या जमिनी हिसकावून घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाच्या निष्ठूरपणामुळे ते मानसिक तणावाखाली जगू लागले आहेत. त्यामुळेच राहुल गांधींच्या या भेटीमुळे येथील राजकीय व्यवस्थेत बदल होणार असून लोकशाही व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ही भेट उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्याला येथे शांतता, प्रगती आणि समृद्धी हवी आहे, असा संदेश या यात्रेने दिल्याचे महिलांनी सांगितले.

प्रियांका गांधी आणि मेहबूबा मुफ्ती सामील : शनिवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेत त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) प्रमुख मेहबूबा मुफ्ती देखील सामील झाल्या होत्या. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथून शनिवारी सकाळी 9.20 वाजता राहुल गांधी यांनी त्यांची 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू केली. एका दिवसापूर्वी, पक्षाने सुरक्षेमध्ये त्रुटी ठेवल्याचा आरोप केल्यानंतर अनंतनाग जिल्ह्यात यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती.

यात्रेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था : या आरोपांवर जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने म्हटले होते की, अपेक्षेपेक्षा जास्त लोक जमल्यामुळे सुरक्षा संसाधनांवर दबाव वाढला. त्यामुळे असे दिसून आले की राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली गेली नाही. शनिवारी पक्षाने सांगितले की, आता यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे आणि सुरक्षा दलांनी यात्रेच्या प्रारंभ बिंदूकडे जाणारे सर्व रस्ते सील केले आहेत. तेथून केवळ अधिकृत वाहनांनाच जाण्याची परवानगी आहे. राहुल गांधींभोवती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा :Rahul Gandhi Security : भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधीच्या सुरक्षेत चूक, संतप्त कॉंग्रेसची प्रशासनावर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details