महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आजपासून बॅंकांच्या या नियमांमध्ये होणार बदल, असा होईल तुमच्यावर परिणाम

मुंबई- १ ऑक्टोबरपासून काही बॅंकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. त्याचा परिणाम थेट तुमच्या बॅंक अकाऊंटवर होणार आहे. तुम्ही बॅंकेत ठेवलेला पैसा या नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे प्रभावित होणार आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

By

Published : Oct 1, 2021, 2:47 PM IST

मुंबई- १ ऑक्टोबरपासून काही बॅंकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. त्याचा परिणाम थेट तुमच्या बॅंक अकाऊंटवर होणार आहे. तुम्ही बॅंकेत ठेवलेला पैसा या नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे प्रभावित होणार आहे.

असे असतील बदल

- आजपासून क्रेडिट आणि डेबिट कार्डवर ऑटो डेबिटचा नवीन नियमा लागू झाला आहे. त्यामुळे बॅंका ग्राहकांच्या माहितीशिवाय अकाऊंटमधून परस्पर पैसे कापू शकणार नाहीत. बॅंकेला आधी तुमची संमती घ्यावी लागले. त्यानंतरच पैसे कापता येतील.

- आजपासूनओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स म्हणजेच ओबीसी बॅंक, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, अलाहाबाद बॅंक यांचे जुने चेकबुक वैध राहणार नाहीत. विलिनिकरणानंतर या बॅंकांचे खाते क्रमांक, चेक बुक क्रमांक, आयएफएफसी कोड बदलण्यात आले आहेत.

- आजपासून ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे पेन्शनधारक त्यांचे लाईफ सर्टिफिकेट सर्व प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये सादर करु शकतील.

- आजपासून म्युचल फंड हाऊसमध्ये काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नवीन नियम लागू झाले आहेत. मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन नियम त्यांना लागू झाले आहेत. एमएससी कंपन्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या १० टक्के रक्कम म्युचल फंड युनियमध्ये गुंतवावी लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details