महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Nityananda Ashram : नित्यानंद आश्रमातून मुलीच्या सुटकेसाठी वडिलांची पोलिसांत तक्रार

तिरुवन्नमलाई येथील नित्यानंद आश्रमातून ( Nityananda Ashram at Tiruvannamalai ) आपल्या मुलीची सुटका करण्यासाठी तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Nityananda Ashram
Nityananda Ashram

By

Published : Jun 27, 2022, 7:46 PM IST

चेन्नई : नित्यानंद आश्रमातून आपल्या मुलीची सुटका करण्यासाठी एका वडिलांनी पोलिसांत तक्रार ( Sri Nagesh lodged a complaint ) दाखल केली आहे. कर्नाटकातील म्हैसूर रोड, बंगळुरू येथे राहणारा नागेश हा निवृत्त अभियंता असून त्याची पत्नी माला प्रोफेसर असल्याचे सांगण्यात येत आहे. या जोडप्याला वैष्णवी आणि वरुडुनी या दोन मुली आहेत. नागेश आणि त्याचे कुटुंब तिरुवन्नमलाई येथील नित्यानंद आश्रमात ( Nithiyananda Ashram ) गेले होते.

दरम्यान, नागेश आणि त्याची पत्नी आणि मोठी मुलगी वैष्णवी यांनी आश्रम सोडला पण धाकटी मुलगी वरुडुनी आश्रमातच राहिली. यावर नागेशने आश्रम प्रशासनाला आपल्या मुलीला सोबत पाठवण्यास सांगितले. परंतु आश्रमाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की वरुडुनीची बेंगळुरू येथील आश्रमातून रवानगी ( Departure from Varuduni Ashram in Bangalore ) करण्यात आली आहे. यानंतर वरुडुनीचे वडील नागेश तिरुवन्नमलाई येथील नित्यानंद आश्रमात गेले असता त्यांना त्यांची मुलगी आश्रमात दिसली.

नित्यानंद आश्रमातून मुलीच्या सुटकेसाठी वडिलांची पोलिसांत तक्रार

मात्र, त्यांची मुलगी येथे नसल्याचे आश्रम प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आले. यामुळे आपल्या मुलीला तेथून कसे बाहेर काढायचे हे नागेशला समजले नाही. यावर नागेशने नित्यानंद आश्रमात अडकलेल्या आपल्या मुलीला वाचवण्यासाठी 26 जून रोजी तिरुवन्नमलाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा -अग्निपथमुळे सैनिकांचे भवितव्य अनिश्चित, ममतांची टीका; 'अंधकार पथ' म्हणून काँग्रेसने केली संभावना

ABOUT THE AUTHOR

...view details