डेहराडून- कोरोना महामारीने देशासह उत्तराखंडच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, बाबा रामदेव यांच्या पंतजली ग्रुपने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 30 हजार कोट्यवधींहून अधिक उलाढाल करण्यात यश मिळविले आहे. पंतजली ग्रुपने ताब्यात घेतलेली सोया कंपनीची आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 16,318 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. पतंजली समुहाची 14 हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल वाढली आहे.
पतंजली ग्रुपच्या आयुर्वेद लिमिटेडने 9,783.81 कोटी रुपये, पतंजली नॅचरल बिस्किटने 650 कोटी रुपये, दिव्य फार्मसीने 850 कोटी रुपये, पंतजली अॅग्रोने 1,600 कोटी रुपये, पतंजली परिवहनने 548 कोटी रुपये, पतंजली ग्रामोद्योगने 396 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर पतंजली ग्रुपची आर्थिक वर्ष 2020-21 वर्षात 14 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.
हेही वाचा-NEET PG 2021 exam 11 सप्टेंबरला होणार- मनसुख मांडवीय
पतंजली ग्रुपच्या माहितीनुसार सोया कंपनीची आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 13,117 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. तर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 16,318 मध्ये कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.
हेही वाचा-फॉरेनच्या वधूने नागपुरातील व्यक्तीची ४० लाखांनी केली फसवणूक; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?
उत्तराखंडचा वार्षिक अर्थसंकल्प हा 57 हजार कोट्यवधी रुपयांचा आहे. तर बाबा रामदेव यांच्या कंपनीची वर्ष 2020-21 मध्ये 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. याचा अर्थ उत्तराखंडच्या सहा महिन्याच्या काळातील अर्थसंकल्पाच्या खर्चापेक्षा पतंजली ग्रुपची उलाढाल अधिक आहे. पतंजली ग्रुपच्या माहितीनुसार रुची सोया कंपनी शेअर बाजारात 4,300 कोटी रुपयांचा एफपीओ आणणार आहे. त्यामुळे शेअर बाजार गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळणार आहे.
हेही वाचा-बलात्कार आरोपी राम रहीमची प्रकृती बिघडल्याने एम्समध्ये दाखल, तपासणीनंतर दिली सुट्टी
रामदेव बाबा यांचे वादग्रस्त विधान -
रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटले होते. अॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्य केले होते. ही उपचारपद्धती म्हणजे मूर्खपणा आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे. कोरोनावर उपचारामध्ये हायड्रोक्लोरिक्विन फेल झाले. नंतर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरलं. लाखो लोकांचा मृत्यू अॅलोपॅथीचा उपचार घेतल्यामुळे झाला आहे. जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं आणि रुग्णालयात न गेल्यामुळे झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण अॅलोपॅथी उपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता अनेक मुत्यूचे कारण अॅलोपॅथिक उपचार पद्धती आहे, असे ते म्हणाले होते.
कोरोनीलची जाहिरात करण्याकरिता बाबा रामदेव यांनी चुकीचा प्रोपागंडा वापरला, अशी इंडियन मेडकिल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली होती.