महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 19, 2021, 2:52 PM IST

ETV Bharat / bharat

'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांना रुग्णालयातून सुट्टी; आत्महत्येचा केला होता प्रयत्न

बाबा का ढाब्यातून प्रसिद्ध झालेले कांता प्रसाद यांनी गुरुवारी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल होते.

Kanta Prasad
'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद

नवी दिल्ली - बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

बाबा का ढाब्यामुळे प्रसिद्ध झालेले कांता प्रसाद यांनी गुरुवारी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल होते. कांता प्रसाद यांच्या मुलाचा जवाबही नोंदविण्यात आल्याचे दक्षिण पोलीस उपायुक्त अतुल ठाकूर यांनी सांगितले. मॅनेजर तुशांतने बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गौरव वासनविरोधात तक्रार दाखल केली होती, अशी माहिती कांता प्रसाद यांच्या मुलाने माध्यमांना दिली.

संबंधित बातमी वाचा-कांता प्रसाद आणि गौरव वासन यांच्यात का झाला होता वाद, मुलाने केला खुलासा

कोरोनामुळे रेस्टॉरंट पडले बंद...

दिल्लीमधील 'बाबा का ढाबा' हा ढाबा काही दिवसांपूर्वी कोणाला माहितही नव्हता. लॉकडाऊनमुळे तिथे कोणी जात नव्हते, ज्यामुळे हा ढाबा चालवत असलेले दाम्पत्य अडचणीत आले होते. मात्र, या ढाब्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता याठिकाणी लोकांच्या रांगा लागल्या. या ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांच्या व्यथा ऐकून, पाहून बऱ्याच जणांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. या मदतीतून त्यांनी ढाबा बंद करत नवे रेस्टॉरंट सुरू केले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट तोट्यात गेल्याने कांता प्रसाद यांना ते बंद करावे लागले. त्यांनी रेस्टॉरंट बंद करुन आपल्या जुन्या जागेतच व्यवसाय सुरु केला आहे. मात्र, आर्थिक अडचणी सुटत नसल्याने त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातमी वाचा-'बाबा का ढाबा'च्या मालकाने दारू पिऊन खाल्ल्या झोपेच्या गोळ्या; रुग्णालयात दाखल

फूड ब्लॉगरमुळे प्रसिद्ध झाले होते कांता प्रसाद -

कोरोनामुळे बर्‍याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘बाबा का ढाबा’ चे मालक कांता प्रसाद यांचेही कोरोनाव्हायरसमुळे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी फूड ब्लॉगर गौरव वासनने कांता प्रसाद यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये कांता प्रसाद रडताना दिसत होते. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर हा धाबा चालवणाऱ्या दोन वयोवृद्ध कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बदामी देवीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लोकांनी मदतीचा हात पुढे केला. मात्र, त्यानंतर कांता आणि गौरवमध्ये वाद झाला आणि गौरवविरोधात कांता प्रसाद यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, चूक लक्षात आल्यानंतर कांता प्रसाद यांनी गौरवची माफी मागितली आहे.

संबंधित बातमी वाचा-'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details