महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Attack on Chief Minister Nitish Kumar : मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने केला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला; कोणतीही दुखापत नाही

मुख्यमंत्री नितीश कुमार ( CM Nitish Kumar ) यांचा ताफा बख्तियारपूर मार्केटमधून जात होता. तेव्हा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांचा जमाव त्यांच्यासाठी घोषणा देत असल्याचे पाहून त्यांनी आपली गाडी थांबवली आणि ते लोकांना भेटण्यासाठी खाली उतरले. यादरम्यान हा तरुण जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना धक्काबुक्की केली.

मुख्यमंत्र्यांवर हल्ला करताना तरुण
मुख्यमंत्र्यांवर हल्ला करताना तरुण

By

Published : Mar 27, 2022, 8:41 PM IST

Updated : Mar 27, 2022, 8:49 PM IST

पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ( CM Nitish Kumar ) यांच्यावर बख्तियारपूरमध्ये हल्ला झाला आहे. एका माणसाने त्यांना धक्काबुक्की केली आहे. मात्र, यात मुख्यमंत्र्यांना दुखापत झाली नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत कसून चौकशी करत आहेत. या तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एका खासगी कार्यक्रमांतर्गत बख्तियारपूर येथे गेले होते. बख्तियारपूर बाजारातून जात असताना रस्त्याच्या कडेला उभी असलेली गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी आपली गाडी थांबवली. याच वेळी त्यांच्या हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांवर हल्ला करताना तरुण

मुख्यमंत्र्यांवर हल्ल्याचा प्रयत्न :असे सांगितले जात आहे की, रविवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा ताफा बख्तियारपूर मार्केटमधून जात होता. तेव्हा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांचा जमाव त्यांच्यासाठी घोषणा देत असल्याचे पाहून त्यांनी आपली गाडी थांबवली आणि ते लोकांना भेटण्यासाठी खाली उतरले. यादरम्यान हा तरुण जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना धक्काबुक्की केली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांनी त्या व्यक्तीला तत्काळ पकडले.

आरोपीचे मानसिक संतुलन बिघडलेले : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणात तैनात असलेल्या जवानांनी त्या वेड्याला लगेच पकडले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरोपी तरुणाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी तरुण मानसिक दृष्ट्या बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांची जनसंवाद यात्रा :मुख्यमंत्री सध्या जनसंवाद यात्रेवर आहेत आणि बारह लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. शनिवारी धनरुवा येथील ससौना गावात आले. जिथे हजारो कार्यकर्त्यांना ते भेटले. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, यावेळी अनेक महिलांनी दारूबंदीवर प्रश्न उपस्थित केले. स्थानिक पोलीस अधिकारी त्यांचे ऐकत नसल्याचे महिलांनी सांगितले. गावा-गावात दारूची विक्री सुरू आहे. यासह विविध प्रश्नही लोकांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडले.

हेही वाचा -Yogi Meeting With Chief Secretary : योगी अ‍ॅक्शन मोडमध्ये!सचिवांना कृती आराखडा तयार करण्याचे दिले निर्देश

Last Updated : Mar 27, 2022, 8:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details