नवी दिल्ली - एलआयसी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची प्रतिक्षा संपली आहे. आजपासून किरकोळ गुंतवणूकदार देशातील सर्वात मोठ्या एलआयसी आयपीओसाठी अर्ज करु शकणार आहेत. ( Today apply for the LIC IPO ) एलआयसीचा आयपीओ (4 मे 9 मे)या कालावधीत सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला आहे. या कालावधी दरम्यान गुंतवणुकदार या आयपीओमध्ये गुंतवणूक करु शकतील.
भारताताली विमा उद्योगाचा विकासदर 17 टक्के, एलआयसीचा विकासदर 7 टक्के आहे. मात्र, अनाधिरकृत बाजारात त्याचा प्रिमियम 85 रुपये आहे. म्हणजेच 949 रुपयांचा शेअर, 1,034 रुपयांवर व्यापार करत आहे. ( Today LIC IPO Is Open) अनेक बाजार विश्लेषकांनी या आयपीओला 'भरणा करण्यायोग्य' अर्थात 'सबस्क्राइब' असा दर्जा दिला आहे. तरीही अनेक बाजार विश्लेषक एलआयसीच्या उणिवांकडे बोट दाखवून गुंतवणूकदारांना सावधही करताना दिसत आहे.
डिजिटल अस्तित्व कमी -एलआयसीचे अस्तित्व डिजिटल मंचावर फारसे दिसत नाही. आजही एलआयसीच्या पॉलिसी अधिकांश प्रतिनिधींच्या मार्फतच विकल्या जातात. (Applications for LIC IPO) एलआयसीने सेबीकडे दिलेल्या कागदपत्रांनुसार एकूण वैयक्तिक प्रीमियमच्या केवळ ३६ टक्के प्रीमियम डिजिटल मंचावरून जमा केला जातो आहे. या तुलनेत खासगी विमा कंपन्यांचा ९० टक्के प्रीमियम डिजिटल माध्यमातून जमा होतो. एलआयसीकडे अशाच पद्धतीने प्रीमियम जमा होत राहिला तर कंपनीचा खर्च वाढत जाणार आहे.