महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Al Qaeda Terrorists Arrested: भोपाळमध्ये अल कायदाच्या 2 संशयित दहशतवाद्यांना अटक, कोलकाता STFची कारवाई

कोलकाता STF ने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या जुन्या भागातून अल कायदाच्या Alqaeda Terrorists दोन संशयित दहशतवाद्यांना अटक Kolkata STF केली आहे. एसटीएफने नुकतेच हावडा आणि दक्षिण २४ परगणा येथून दोन दहशतवाद्यांना अटक केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या चौकशीनंतर कोलकाता एसटीएफने ही कारवाई केली आहे. अटक केलेले दोन्ही दहशतवादी यापूर्वी कोलकाता येथे भाड्याच्या घरात राहत होते. मात्र, काही काळ भोपाळमध्ये राहत होते. अटक करण्यात आलेल्या संशयितांची ओळख मात्र उघड करण्यात आलेली नाही. Alqaeda terrorists arrested Bhopal kolkata STF action

Al Qaeda Terrorists Arrested
Al Qaeda Terrorists Arrested

By

Published : Sep 30, 2022, 12:16 PM IST

भोपाळ : अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना कोलकाता पोलिसांनी नुकतेच हावडा आणि 24 परगणा येथून अटक Al qaeda terrorists arrested Bhopal केली. त्यांच्या चौकशीत त्यांचे आणखी दोन साथीदार भोपाळमध्ये लपून बसल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही संशयित सतत आपली ओळख लपवून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. kolkata STF action

एसटीएफने दोघांना कोलकाता येथे नेले: यापूर्वी ते मिलन आणि मोहन पात्रा या नावाने राहत होते. पुढे ते इब्राहिम आणि जाहिलुद्दीन या नावाने राहू लागले. एक दिवस आधी कोलकाता पोलिसांना त्यांची माहिती मिळाली. यानंतर, एमपी पोलिसांच्या मदतीने कोलकाता एसटीएफने भोपाळच्या जुन्या परिसरातून दोन्ही संशयितांना पकडले. कोलकाता पोलिसांनी दोन्ही संशयितांना कोलकाता येथे नेले. STF took both to Kolkata. मात्र, कोलकाता पोलिसांच्या कारवाईबाबत मध्य प्रदेश पोलिसांनी मौन बाळगले आहे.

अद्याप संशयिताचा शोध : कोलकाता एसटीएफच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही संशयित दहशतवाद्यांविरोधात UAPA कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोमजूर येथील एका प्रकरणात चार जणांना आरोपी करण्यात आले होते. विशेष म्हणजे, मार्च महिन्यातही भोपाळच्या जुन्या परिसरातून सहा जेएमबी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या तारा पश्चिम बंगालमधील कोलकात्याशीही जोडल्या गेल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details