नवी दिल्ली-अलकायदा ही भारतात सक्रीय होत असल्याचे चित्र समोर येत आहे.आसाममध्ये अल-कायदाशी संबंधित ( Al Qaeda linked terrorists ) दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला आहे. अकरा दहशतवाद्यांना अटक करण्यात ( terrorists nabbed in Assam ) आली आहे.
अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात आत्मघाती हल्ल्याची धमकी दिली होती. अल कायदाने 6 जून रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रात धमकी दिली आहे की ते गुजरात, यूपी, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघातकी हल्ले करण्यास तयार आहेत. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्हीवरील चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अल कायदाने ही धमकी दिली आहे. "पैगंबरांच्या सन्मानासाठी लढण्यासाठी" दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ले करणार असल्याचे अल कायदाने म्हटले आहे. आमच्या पैगंबरांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही ठार करू, असे अल कायदाच्या पत्रात म्हटले आहे. आमच्या पैगंबरांचा अपमान करणार्यांना उडवण्यासाठी आम्ही आमच्या शरीरावर आणि आमच्या मुलांच्या अंगावर स्फोटके बांधू... भगव्या दहशतवाद्यांना आता दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये त्यांच्या अंताची वाट पहावी लागेल. असाही त्यात इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर या 11 दहशतवाद्यांची अटक करण्यात आली आहे.
दहशतवादी संघटनांच्या नजरा भारतावर -अल कायदाची उपशाखा आणि अफगाणिस्तानात कार्यरत असलेली दहशतवादी संघटना AQIS च्या नजरा भारतावर आहेत. संयुक्त राष्ट्राने आपल्या ताज्या अहवालात इशारा दिला होती की, AQIS ने मार्च 2020 मध्ये आपल्या मासिकाचे नाव 'नवा-ए-अफगाण जिहाद' वरून बदलून 'नवा-ए-गझवा-ए-हिंद' केले होते. दहशतवादी संघटना भारतात कारवाया वाढवत असल्याचे यावरून दिसून येते. UN च्या प्रतिबंध मॉनिटरिंग अँड अॅनालिसिस टीमच्या 13व्या अहवालानुसार, AQIS अफगाणिस्तानमध्ये ही संघटना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेली आहे. त्यात 180 ते 400 दहशतवादी आहेत. त्यात भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तानचे नागरिक आहेत. हे दहशतवादी गट गझनी, हेलमंड, कंदाहार, निमरुज, पक्तिका, जाबुल या राज्यांमध्ये आहेत. ऑक्टोबर 2015 मध्ये कंदाहारमध्ये अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या संयुक्त ऑपरेशननंतर ते कमकुवत झाले, परंतु संपले नाहीत. आता आर्थिक मदत मिळणेही त्यांच्या अडचणी वाढले आहे. त्यामुळेच तो आक्रमक वृत्ती दाखवू शकत नाही.