महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ASRB Recruitment 2022 ICAR : कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाकडून  349 पदांची भरती; अर्जासाठी 7 नोव्हेंबरपर्यंत वाढ

राज्यातील विविध प्रादेशिक व विभागीय केंद्रांमध्ये प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञाच्या (Agricultural Scientist Selection Board) एकूण 349 पदांसाठी (recruiting for 349 posts) अनुक्रमे 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत (extension till 7th November for application) अर्ज करता येतील. अर्जाची फी 1500 रुपये आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्युडी आणि सर्व महिला उमेदवारांसाठी फी माफ आहे. ASRB Recruitment 2022 ICAR

ASRB Recruitment 2022 ICAR
349 पदांची भरती

By

Published : Oct 31, 2022, 3:54 PM IST

कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग (DOARE), कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत कृषी वैज्ञानिक निवड मंडळ (ASRB) ने आयसीएआर (ICAR) च्या विविध प्रादेशिक स्टेशन्स आणि केंद्रांवर विविध पदांच्या भरतीसाठी (Agricultural Scientist Selection Board) जाहिरात काढली आहे. काढलेल्या जाहीरातीनुसार स्थानकांवर आणि केंद्रांवर विभागप्रमुख आणि वरिष्ठ वैज्ञानिक-सह-प्रमुख अशा एकूण 349 पदांची भरती (recruiting for 349 posts) केली जाणार आहे. ASRB Recruitment 2022 ICAR

एएसआरबी भर्ती 2022 : एएसआरबीद्वारे जाहिरात केलेल्या ३४९ प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि सक्षम उमेदवार बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट asrb.org.in वरील भरती विभागात सक्रिय केलेल्या लिंकला भेट देऊन किंवा ऑनलाइन अर्ज पोर्टल asrbapplication.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. सर्व विभाग प्रमुख पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 ऑक्टोबरपासून सुरू आहे आणि त्याची अंतिम तारीख जी आधी 31 ऑक्टोबर होती, ती आता 7 नोव्हेंबरपर्यंत (extension till 7th November for application) वाढवण्यात आली आहे. त्याच वेळी, वरिष्ठ शास्त्रज्ञ-सह-प्रमुख पदांसाठी अर्ज प्रक्रिया मंगळवार, 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि इच्छुक उमेदवार 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतील.

एएसआरबी भर्ती 2022 अर्ज फी :उमेदवारांनी नोंद घ्यावी की, एएसआरबी विभाग प्रमुख आणि वरिष्ठ वैज्ञानिक-सह-प्रमुख या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करताना, 1500 रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, युपीआय) ने भरावे लागेल. तथापि, एससी, एसटी, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार आणि सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. ASRB Recruitment 2022 ICAR

ABOUT THE AUTHOR

...view details