आग्राAgra News :आग्राशहरातील ज्येष्ठ लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.लखन सिंह गालव यांचे रविवारी सकाळी आग्रा येथे रेल्वे अपघातात निधन झाले. डॉ. लखन सिंह गालव हे आपल्या मुलीला सोडण्यासाठी राजा की मंडी स्टेशनवर गेले होते. तेथे रेल्वे रुळावर पाय अडकल्यानं ते रुळावर पडले अन् ट्रेन थेट त्यांच्या अंगावरून गेली. ट्रेनच्या धडकेनं त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. या घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली.
मुलीला रेल्वे स्टेशनवर सोडायला गेले : डॉ. लखन सिंह गालव हे शहरातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ लॅप्रोस्कोपिक सर्जन होते. ते गैलाना रोडवरील अशोका हॉस्पिटलजवळ राहत होते. त्यांचे क्लिनिक आरबीएस डिग्री कॉलेज, बंगाली क्वार्टरजवळ कॉलनीत होते. ते एका खासगी रुग्णालयात सेवा देत होते. डॉ. लखन सिंह गालव यांची मुलगी केजीएमयू, लखनऊमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान डॉ. लखन सिंह गालव हे आपल्या मुलीला लखनौला जाण्यासाठी राजा की मंडी रेल्वे स्टेशनवर सोडायला गेले होते. मुलीला ट्रेनमध्ये बसवल्यानंतर त्यांचा पाय रेल्वे रुळावर अडकला. पाय अडकताच त्यांचा तोल गेला अन् ते खाली पडले. यादरम्यान त्यांना ट्रेनची धडक बसली. त्यामुळं त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.