शाहजहांपूर :27 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये शेजारी राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांवर 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. यानंतर बलात्कार पीडित मुलगी आई झाली होती आणि तिने मुलाला जन्म दिला होता. पीडितेने 27 वर्षांपूर्वी बलात्काराची तक्रार दाखल केली होती (Rape culprit arrested after DNA test). त्यामध्ये पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरुद्ध कलम 452,376(2), आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपीचा डीएनए करवून घेतला. ज्यामध्ये मुलाचा आणि मुलाच्या आईचा डीएनए जुळला आहे. आता पोलिसांनी तब्बल २७ वर्षांनंतर यावरुन एका आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे (After 27 rape victim got justice). या प्रकरणात एका आरोपीला अटक केल्याने बलात्कार पीडित आईला 27 वर्षांनंतर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
दोन तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा -वास्तविक ही घटना 27 वर्षांपूर्वीची आहे. पोलीस स्टेशन सदर बाजार परिसरात राहणाऱ्या एका महिलेने त्याच वस्तीत राहणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पीडितेने आरोप केला होता की, जेव्हा ती 12 वर्षांची होती, त्यावेळी तिच्यावर अत्याचार झाला. त्यानंतर नकी हसन आणि गुड्डू उर्फ मोहम्मद राझी यांनी याची वाच्याता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर ती गरोदर राहिली आणि तिला मुलगा झाला.