रायपूर - कोरोना लसीकरणाचे सर्वेक्षण करणारे आहोत, अशी थाप मारून रत्नागिरीमधील महिलेने प्रियकरासहित रायपूरमध्ये चोरी केली आहे. या दोघाही आरोपींना रायपूर पोलिसांनी रत्नागिरीमधून शनिवारी अटक केली आहे. आरोपी महिला व तिचा प्रियकर हे उच्चशिक्षीत असून शेअर बाजारातील ट्रेडर्स आहेत.
आरोपी महिला व तिच्या प्रियकराने सालासर ग्रीनमधील आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये चोरी केली. आरोपींनी चोरीच्या दरम्यान वापरलेल्या अॅक्टिव्हावर बनावट नंबर प्लेट वापरली होती. ने फ्लॅटमधील पीडितेच्या हाता-पायांना दावे बांधून मुलासमेवत बाथरुममध्ये बंद केले होते. त्यानंतर घरातील दागिने आणि लॅपटॉप घेऊन फरार झाले होते.
हेही वाचा-कोरोना आटोक्यात, तरीही ७३९ रुग्ण क्रिटिकल, १०९४ आयसीयूत!
पैसे न मिळाल्याने केली फ्लॅटमध्ये चोरी-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला आरोपी आयशाने सीएचा अभ्यास केलेला आहे. ऑनलाईन शेअर बाजार ट्रेडिंगचेही आरोपी महिलेने काम केले आहे. ऑनलाईन ट्रेडिंग करताना आयशाची ओळख पीडितेचा पती संजीव कुमारशी झाली. संजीव कुमारकडून आयशाला काही पैसे येणे होते. है पैसे न मिळाल्याने आयशाने प्रियकरासमवेत घरात चोरी केली आहे. पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला रत्नागिरीमधून अटक केली आहे.
हेही वाचा-कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून ४ ते ६ आठवड्यात मिळणार परवानगी
चोरीपूर्वी केली रेकी-
महिला आरोपी आयशाही रत्नागिरीमधील रहिवासी आहे. तिचा आरोपी इरशादसोबत साखरपुडा झाला आहे. संजीव कुमार याच्याबरोबर दोघेही शेअर बाजार ट्रेडिंगचे व्यवहार करत होते.
हेही वाचा-कडकनाथचे चिकन खाल्ल्याने वाढते प्रतिकारक्षमता, मध्य प्रदेशमधील संशोधन संस्थेचा दावा