महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Udaipur Murder : राजस्थानमध्ये भरदिवसा तरुणाची हत्या, नुपूर शर्माच्या बाजूने सोशल मीडियावर केली होती पोस्ट; दोघे अटकेत

राजस्थानच्या उदयपूरमध्ये भरदिवसा एका तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तातडीने जिल्हाधिकारी ताराचंद मीना, एसपी मनोज चौधरी हेही घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे संतप्त व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. ( Murder in Udaipur ) या तरुणाने सोशल मीडियावर भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या बाजूने पोस्ट टाकली होती असे सांगितले जात आहे.

राजस्थानमध्ये भरदिवसा तरुणाची हत्या
राजस्थानमध्ये भरदिवसा तरुणाची हत्या

By

Published : Jun 28, 2022, 6:35 PM IST

Updated : Jun 28, 2022, 10:18 PM IST

उदयपुर (राजस्थान) -शहरातील धान मंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शहराच्या मध्यभागी असलेल्या मालदास स्ट्रीट परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तरूणांनी भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या बाजूने पोस्ट टाकल्याचे सांगितले जात आहे. ( Youth Murdered in Udaipur City ) हत्येनंतर मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तीव्र संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलिसांनी मृतदेह एमबी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला आहे. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्यात महिनाभरासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री गेहलोत यांनी नागरिकांना केले आहे.

उदयपूरच्या भात मंडी परिसरात एका दुकानात घुसून सुप्रीम टेलरचे मालक कन्हैया लाल साहू यांची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मृताने भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या बाजूने पोस्ट टाकली होती. ( Udaipur Murder Case ) यानंतर एका विशिष्ट समाजातील दोन तरुण त्याला सतत धमक्या देत होते. गेल्या काही दिवसांपासून या तरुणाने दुकानही उघडले नव्हते. मात्र, मंगळवारी दुकान उघडले असता कपडे शिवण्याच्या नावाखाली दोन जण आले. यादरम्यान कपड्यांचे मोजमाप करत असताना तरुणांनी गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.

काही दिवसांपूर्वी या तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार देऊन एका विशिष्ट समाजाच्या लोकांविरोधात नाव नोंदवले होते. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी एसपी मनोज चौधरी यांना फोन करून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. ( Post on social media in favor of Nupur Sharma ) या घटनेमुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. या घटनेचा एक लाईव्ह व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तरुणाची निर्घृण हत्या करताना दिसत आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आणि एसपी घटनास्थळी लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, संतप्त लोक आपल्या मागण्यांसाठी आणि आरोपींना पकडण्यासाठी सतत आंदोलन करत आहेत. ( A young man has been Murder in Udaipur ) उदयपूरचे एसपी मनोज चौधरी यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निर्दयी खून झाला आहे, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले आहेत.

हेही वाचा -Surat Police: चित्रपट स्टाईलने सुरत पोलिसांची कारवाई; व्हिडीओ व्हायरल

Last Updated : Jun 28, 2022, 10:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details