महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 57 लाखाची सोन्याची बिस्किटे जप्त

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर केरळमधील एका व्यक्तीला 57 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बिस्किटांसह ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती कस्टमच्या एअर इंटेलिजेंस युनिटने दिली आहे.

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 57 लाखाची सोन्याची बिस्किटे जप्त
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 57 लाखाची सोन्याची बिस्किटे जप्त

By

Published : Jun 5, 2021, 5:38 AM IST

पणजी (गोवा) - गोवा कस्टमच्या एअर इंटेलिजेंस युनिटने शुक्रवारी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर केरळमधील एका व्यक्तीला 57 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बिस्किटांसह ताब्यात घेतले असल्याची माहिती, कस्टमच्या एअर इंटेलिजेंस युनिटने दिली आहे. दरम्यान, 2021 या वर्षात गोवा सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने 2.89 कोटीच सोनं पकडलं आहे.

'एकूण 10 तोळा सोन्याची 11 बिस्कीट'

सीमाशुल्क सहाय्यक आयुक्त वाय. बी. सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा कस्टमच्या एअर इंटेलिजेंस युनिटने बिलाल नगर, नेल्लीकट्टा, पीओ-नेकराजे, कासारगड, केरळ येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. शारजाह ते गोवा येथे एअर अरेबियाच्या विमान क्रमांक (G9 492) ने तो शुक्रवारी गोव्यात दाखल झाला. त्याच्याकडे एकूण 10 तोळा सोन्याची 11 बिस्कीट होती. त्याची अंदाजे किंमत (57.75) लाख रुपये असून, वजन 1276 ग्राम आहे. अशी माहिती गोवा कस्टमच्या एअर इंटेलिजेंस युनिटने दिली आहे.

'2021 मध्ये 2.89 कोटीच सोनं जप्त'

आरोपीने आपल्या बॅगमध्ये हे सोने लपविले होते. सीमाशुल्क अधिनियम 1962 च्या तरतुदीनुसार सोनं जप्त करण्यात आलं आहे. असे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, 2021 या वर्षात गोवा सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने ताब्यात घेतलेल्या सोन्याचे एकूण मूल्य अंदाजे 2.89 कोटी रुपये आहे. याबाबतचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती गोवा सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details