महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विषारी दारू प्यायल्यामुळे २७ जणांचा मृत्यू

गेल्या ४ दिवसात जवळपास २७ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांतील अनेकांचा दावा आहे की मृत्यू विषारी दारूचे सेवन केल्यामुळेच होत आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री होत आहे.

By

Published : Nov 5, 2020, 8:05 PM IST

सोनीपत -हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. गेल्या ४ दिवसात जवळपास २७ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांतील अनेकांचा दावा आहे की मृत्यू विषारी दारूचे सेवन केल्यामुळेच होत आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री होत आहे.

विषारी दारू प्यायल्यामुळे २७ जणांचा मृत्यू

पोलीस प्रशासन अनभिज्ञ -

गेल्या अनेक दिवसांपासून मृत्युचे प्रमाण वाढलेले आहे मात्र सोनीपत पोलिसांना याबाबत काहीच माहिती नाही. जेव्हा याबाबत पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा पोलीस विभागात खळबळ उडाली. सीआयए आणि गुन्हे शाखेने छापे टाकण्यास सुरुवात केली. यात एका दुकानातून मोठ्या प्रमाणात दारु जप्त करण्यात आली.

दारुड्याने दिली कबुली -

विषारी दारू प्यायल्याने मृत्यू होत आहेत असे सांगितले जात असले तरी शवविच्छेदन अहवालानंतर सत्य परिस्थिती बाहेर येईल. सोनीपतमध्ये अवैध दारुविक्री सुरू आहे. स्वस्त दारू घेण्याच्या नादात आम्ही अवैध दारू विकत घेत आहे, अशी कबुलीही एका दारुड्याने दिली.

दरम्यान, सोनीपत जिल्हा आधीच दारू घोटाळ्यामुळे चर्चेत आहे. अशात हे नवे प्रकरण उघडकीस आले आहे. विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू होत असल्याचे बोलले जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर यातील सत्य समोर येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details