कोलकाता - शहरातील गजबजलेल्या भागात एका इमारतीचा काही भाग कोसळून आजी-नातावाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी पोलीस, एनडीआरएफचे जवान दाखल झाले असून, बचावकार्य अद्यापही सुरू आहे.
कोलकाता येथे इमारतीचा भाग कोसळला हेही वाचा -बंगळुरुमध्ये ६० विद्यार्थ्यांना कोरोना, शाळेत गेल्याने झाली बाधा, महाराष्ट्रातील शाळा ४ नोव्हेंबरला होणार सुरु
- ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना काढले बाहेर -
उत्तर कोलकत्यातील एहिरिटोला परिसरात ही दुर्घटना घडली. आज सकाळी येथील एका इमारतीचा काही भाग कोसळला. पावासामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले होते. त्यातील बहुतांश लोकांना स्थानिक नागरिक आणि एनडीआरएफच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले.
- घटनेत एकूण तिघांचा मृत्यू -
यासंदर्भात माहिती देताना जोरावगान पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले, की या घटनेत ३ वर्षांचा मुलगा आणि त्याच्या आजीचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखालून काढले तेव्हा दोघे जिवंत होते. पण आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर मृत्यू झाला. ढिगाऱ्याखालून काढलेल्या इतर चौघांवर याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा -सरनाईक-परब-अडसूळांनंतर आता शिवसेना खासदार भावना गवळी यांना 'ईडी'चे समन्स