कुल्लू : हिमाचल प्रदेशमध्ये असलेले कौमिक हे गाव जगातील सर्वात उंचीवर असलेले गाव म्हणून ओळखले जाते. या गावामध्ये ४५ वर्षे वयांवरील लोकांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले आहे. तसेच, ६० वर्षांवरील लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
वर्षाचे सहा महिने लाहौल स्पिटी हा जिल्हा बर्फाखाली असतो. या जिल्ह्यामध्ये सध्या १८ ते ४४ वर्षे वय असणाऱ्यांचे लसीकरण सुरू आहे. या वयोगटातील ७७ लोकांना सोमवारी लस देण्यात आली. कॉमिक गावाबाबत बोलायचे झाल्यास, तेथील ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लवकरच त्यांना दुसरा डोसही देण्यात येईल. समुद्रसपाटीपासून तब्बल ४,५८७ मीटर उंचीवर असणाऱ्या या गावातील १०० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी ज्ञानसागर नेगी यांनी याबाबत माहिती दिली.
गावोगावी जात लोकांना केले जागरुक..