ETV Bharat / state

मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन - भुजबळ

Chhagan Bhujbal : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणाचा अहवाल येत्या आठवडाभरात राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर मराठा समाज आरक्षण कायद्यात सुधारणा करण्यासाठी 15 फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय.

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 6:57 PM IST

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

मुंबई Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष चिघळत असतानाच मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. 15 फेब्रुवारी विधिमंडळाचे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या अधिवेशनात मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

विशेष अधिवेशन : मराठा आरक्षणासाठी विधिमंडळानं 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावलं आहे. कुणबींची ओबीसी प्रवर्गात घुसखोरी होत आहे, त्याऐवजी त्यांना वेगळं आरक्षण द्यावं, अशी मागणी विधिमंडळाच्या 15-16 फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष अधिवेशनात करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळं मराठा समाजासाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात नवीन अधिसूचनेवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे. कुणबीतील सगे सोयरे प्रमाणपत्र तसंच मागासवर्ग आयोगानं सादर केलेल्या अहवालावर अधिवेशनात चर्चा होईल. मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा अल्टिमेटम दिला आहे. तो अजूनही कायम आहे.

जरांगे खरे पाटील असेल तर : मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना छगन भुजबळांनी मराठा समाजाच्या नवीन अध्यादेशाविरोधात भूमिका घेतली, तर मंडल आयोगाला चॅलेंज करू असं म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले जरांगे खरे पाटील असतील, त्यांनी मंडल आयोगाविरोधात भूमिका घेऊन दाखवावी. जरांगे पाटील स्वतःला काय समजतात. इथं हुकुमशाही आहे का? इथं लोकशाही आहे. तसंच भुजबळांनी जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख केलाय. ओबीसी आरक्षणाचा निर्माता मंडल आयोग आहे. मंडल आयोग संपवायची भाषा करणारेच ओबीसीतून आरक्षण मागतायत, असा टोला देखील भुजबळांनी जरांगेंना लगावलाय.

हे वाचलंत का :

  1. मंडल आयोगाला चॅलेंज करावंच लागेल; मनोज जरांगे पाटील यांनी दिला इशारा
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल लोकांमध्ये आस्था, आमच्या जागा 2019 पेक्षा वाढतील; फडणवीसांचा दावा
  3. काँग्रेसला मोठा धक्का; मिलिंद देवरांपाठोपाठ आणखी एका नेत्याने सोडला काँग्रेसचा 'हात'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.