ETV Bharat / state

एकनाथ शिंदेंचा कट्टर 'वाघ' हरपला, अनिल बाबर यांनी घेतला अखेरचा श्वास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 9:38 AM IST

Updated : Jan 31, 2024, 10:04 AM IST

Anil Babar Passed Away : सांगली खानापूर मतदार संघाचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नेते आमदार अनिल बाबर यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. सांगलीतील एका खासगी रुग्णालयात आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Anil Babar Passed Away
आमदार अनिल बाबर

सांगली Anil Babar Passed Away : शिवसेना शिंदे गटाचे सांगलीतील विटा-खानापूर मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन झालं आहे. वयाच्या 74 वा वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निमोनिया झाल्यानं काल त्यांना सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज पहाटे त्यांचं निधन झालं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. महाविकास आघाडीचे कट्टर विरोधक म्हणून त्यांचं नाव घेतलं जात होतं. गुवाहाटीला जाण्यात त्यांची भूमिका मोठी होती. म्हणून शिवसेना अपात्रतेच्या यादीत त्यांचं नाव आघाडीवर होतं.

  • खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.… pic.twitter.com/j7olT9DawH

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 31, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अपक्ष म्हणून पहिल्यांदा झाले आमदार : जिल्हा परिषद सदस्य ते 3 वेळा आमदार म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द चांगलीच गाजली आहे. 1990 साली अनिल बाबर हे पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते शिवसेनेत दाखल होत आमदार म्हणून विजयी झाले. 2019 मध्ये देखील शिवसेनेच्या चिन्हावर ते निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडात बाबर यांनी साथ दिली होती. शिंदे गटातील एक ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांची ओळख होती. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत शिंदे गटाकडून नुकतेच त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं देण्यात आले होते.

  • विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द… pic.twitter.com/v6vQn4RW2g

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 31, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="

विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द… pic.twitter.com/v6vQn4RW2g

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 31, 2024 ">

टेंभू योजनेचे नायक : सांगलीतील खानापूर-विटा परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळ होता. त्यामुळं शासनानं टेंभू योजना जाहीर केली होती. मात्र ही योजना वर्षानुवर्ष रखडली होती. त्यामुळं या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पाठपुराव्यामुळंच टेंभू योजना पूर्णत्वास गेली. त्यामुळं आमदार अनिल बाबर यांना टेंभू योजनेचे नायक म्हणून आमदार अनिल बाबर यांची ओळख होती.

मागील वर्षी पत्नीचं झालं होतं निधन : शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांनी आज पहाटे सांगतील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं शिंदे गटासह खानापूर विटा मतदार संघातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचं मागील वर्षी आजारानंच 3 ऑगस्टला निधन झालं होतं. आमदार अनिल बाबर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात असतानाचं त्यांना पत्नीशोक झाला होता.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार : खानापूर विटा मतदार संघाचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक अनिल बाबर यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी " खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे किंवा रक्तदान शिबिरांचे आयोजन, कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून केलेले प्रयत्न असो किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच बाबर कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली." अशा भावना अनिल बाबर यांच्याविषयी 'एक्स'वर व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील मंत्री अनिल बाबर यांच्या अंत्यविधीला आज सांगलीत उपस्थित राहणार आहेत. दुपारी अनिल बाबर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

'अनिल बाबर यांचं निघून जाणं अत्यंत वेदनादायी' : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज पहाटे निधन झाल्यानं राजकीय क्षेत्रातून मोठा शोक व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनिल बाबर यांच्याविषयी शोक व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी "विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्याने भेटत असत. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे, मनाला अत्यंत वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांती" अशाप्रकारे 'एक्स'वर शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

  1. Anil Babar Reaction On ECI Decision : आम्हाला कामाख्या देवी पावली, निवडणूक आयोगाच्या निकालावर अनिल बाबर यांची प्रतिक्रिया
  2. Anil Babar Wife Passed Away: शिवसेना आमदार अनिल बाबर यांना पत्नीशोक; काही दिवसांपासून होत्या आजारी

सांगली Anil Babar Passed Away : शिवसेना शिंदे गटाचे सांगलीतील विटा-खानापूर मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन झालं आहे. वयाच्या 74 वा वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निमोनिया झाल्यानं काल त्यांना सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज पहाटे त्यांचं निधन झालं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. महाविकास आघाडीचे कट्टर विरोधक म्हणून त्यांचं नाव घेतलं जात होतं. गुवाहाटीला जाण्यात त्यांची भूमिका मोठी होती. म्हणून शिवसेना अपात्रतेच्या यादीत त्यांचं नाव आघाडीवर होतं.

  • खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.… pic.twitter.com/j7olT9DawH

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 31, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अपक्ष म्हणून पहिल्यांदा झाले आमदार : जिल्हा परिषद सदस्य ते 3 वेळा आमदार म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द चांगलीच गाजली आहे. 1990 साली अनिल बाबर हे पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते शिवसेनेत दाखल होत आमदार म्हणून विजयी झाले. 2019 मध्ये देखील शिवसेनेच्या चिन्हावर ते निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडात बाबर यांनी साथ दिली होती. शिंदे गटातील एक ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांची ओळख होती. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत शिंदे गटाकडून नुकतेच त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं देण्यात आले होते.

  • विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द… pic.twitter.com/v6vQn4RW2g

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 31, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

टेंभू योजनेचे नायक : सांगलीतील खानापूर-विटा परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळ होता. त्यामुळं शासनानं टेंभू योजना जाहीर केली होती. मात्र ही योजना वर्षानुवर्ष रखडली होती. त्यामुळं या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पाठपुराव्यामुळंच टेंभू योजना पूर्णत्वास गेली. त्यामुळं आमदार अनिल बाबर यांना टेंभू योजनेचे नायक म्हणून आमदार अनिल बाबर यांची ओळख होती.

मागील वर्षी पत्नीचं झालं होतं निधन : शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांनी आज पहाटे सांगतील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं शिंदे गटासह खानापूर विटा मतदार संघातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचं मागील वर्षी आजारानंच 3 ऑगस्टला निधन झालं होतं. आमदार अनिल बाबर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात असतानाचं त्यांना पत्नीशोक झाला होता.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार : खानापूर विटा मतदार संघाचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक अनिल बाबर यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी " खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे किंवा रक्तदान शिबिरांचे आयोजन, कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून केलेले प्रयत्न असो किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच बाबर कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली." अशा भावना अनिल बाबर यांच्याविषयी 'एक्स'वर व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील मंत्री अनिल बाबर यांच्या अंत्यविधीला आज सांगलीत उपस्थित राहणार आहेत. दुपारी अनिल बाबर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

'अनिल बाबर यांचं निघून जाणं अत्यंत वेदनादायी' : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज पहाटे निधन झाल्यानं राजकीय क्षेत्रातून मोठा शोक व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनिल बाबर यांच्याविषयी शोक व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी "विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्याने भेटत असत. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे, मनाला अत्यंत वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांती" अशाप्रकारे 'एक्स'वर शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

  1. Anil Babar Reaction On ECI Decision : आम्हाला कामाख्या देवी पावली, निवडणूक आयोगाच्या निकालावर अनिल बाबर यांची प्रतिक्रिया
  2. Anil Babar Wife Passed Away: शिवसेना आमदार अनिल बाबर यांना पत्नीशोक; काही दिवसांपासून होत्या आजारी
Last Updated : Jan 31, 2024, 10:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.