ETV Bharat / state

'सर्पराज्ञी उपचार केंद्र' गेल्या 25 वर्षांपासून वन्य प्राण्यांवर करतायेत उपचार, हजारोंना दिलं जीवदान - Sarpadhynapi Treatment Center

Sarpadhynapi Treatment Center Beed : बीडच्या शिरूर तालुक्यातील तागडगाव या गावामध्ये सर्पराज्ञी हे वन्यजीव उपचार केंद्र मागील 25 वर्षांपासून वन्य प्राण्यांवर उपचार करत आहे. जवळपास 17 हजार प्राण्यांवर उपचार केले. यासाठी सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे हे अहोरात्र झटत आहे. जाणून घेऊया त्यांच्या परिश्रमाची गाथा

Sarpadhynapi Treatment Center
सर्पराज्ञी उपचार केंद्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 8:39 PM IST

Updated : Jun 16, 2024, 10:39 PM IST

बीड Sarpadhynapi Treatment Center Beed : आपण अनेक वेळा माणसांवर उपचार करणारी माणसं पाहिली आहेत. जनावरांचे देखील दवाखाने आपण पाहिले आहेत; मात्र वन्यजीव प्राण्यांचा अपघात झाल्यावर उपचार करणारे देखील काही माणसं या पृथ्वीतलावर आहेत. या ठिकाणी अनेक हिंस्र प्राणी देखील उपचार घेतात. यामध्ये लांडगा, उद, रानमांजर, वानर, माकड, ससा, हरिण, गरुड, मोर, काळवीट, घुबड, अजगर असे विविध प्राणी या ठिकाणी जखमी झाल्यानंतर पाठवले जातात. त्यांच्यावर उपचार करून या ठिकाणी असलेले सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे हे यांच्यावर उपचार करतात. त्यांना तंदुरुस्त करतात व पुन्हा त्यांना जीवन जगण्यासाठी सोडतात. सर्पराज्ञी महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव उपचार केंद्र आहे. काय म्हणतात सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे आपण पाहूया

सर्पराज्ञी हे वन्यजीव उपचार केंद्राविषयी सांगताना सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे (ETV Bharat Reporter)

17 हजार वन्यजीव प्राण्यांवर उपचार : लहानपणापासूनच सिद्धार्थ सोनवणे यांना वन्यजीव प्राण्यांना वाचवण्याची आवड होती आणि त्यांनी गेली 25 वर्षांपासून अनेक प्राण्यांना जीवदान दिलं. जखमी प्राणी मला भेटले किंवा कुणी आणून दिले तर मी त्यांच्यावर घरीच उपचार करायचो; मात्र अनेक प्राणी येऊ लागल्याने शेजाऱ्यांना त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे वडिलांनी मला जी वडिलोपार्जित शेती आहे त्या शेतीवर शेड बांधून दिलं आणि त्या शेडमध्ये गेली 25 वर्षांपासून या ठिकाणी प्राण्यांची सेवा करत आहे. जसजशी गरज पडेल तसतशी शेडची संख्या वाढवत गेलो आणि आता अनेक प्राणी या ठिकाणी उपचार घेत आहेत. आतापर्यंत जवळपास 17 हजार वन्यजीव प्राण्यांवर उपचार करून त्यांना जंगलात सोडले आहे तर या ठिकाणी दुर्मिळ अतिदुर्मिळ आणि संकटग्रस्त वन्यजीव प्राण्यांना या ठिकाणी संरक्षण दिलं आहे आणि जीवदान देखील दिलं आहे, असं सिद्धार्थ सोनवणे म्हणाले.

खवले मांजर, लांडगा, गिधाड आहे की अशा वन्य प्राण्यांना मी संरक्षण दिलं आहे. हे सर्पराज्ञी केंद्र सर्वांच्या सहकार्यातून चालतं. त्यामुळे अनेक मदतीचे हात या ठिकाणी सरसावत आहेत. सर्वांनी मिळून हे सर्पराज्ञी केंद्र चालवलं आहे आणि मी काही नागरिकांना आवाहन करतो की, आपण परिसरात फिरत असताना एखादा वन्यप्राणी जखमी झाला असेल तर आमच्याशी संपर्क करावा किंवा या ठिकाणी आणून सोडवावा. -- सिद्धार्थ सोनवणे, सर्पराज्ञी संचालक

लहानपणापासूनच मला वन्य प्राण्यांचं संरक्षण करण्याचं आवडायचं आणि सिद्धार्थ याच्याबरोबर मी साप असेल अजगर असेल हे पकडायला जायचे. तेव्हापासून आम्ही बरोबर आहोत आणि या सर्पराज्ञी केंद्रात जवळपास 16 ते 17 हजार वन्यजीव प्राण्यांना जीवदान दिलं आणि त्यांना त्यांच्या मार्गावर सोडलं. गेली 25 वर्षांपासून आम्ही हे काम करत आलो आहोत. या ठिकाणी ससा, लांडगा, कोल्हा, खवले मांजर, घुबड, गिधाड, मोर, लांडोर, साप, अजगर, गरुड, हरीण, काळवीट अशा अनेक प्राण्यांवर आम्ही उपचार केले आहेत. या ठिकाणी आलेल्या प्राण्यांना जीव लावतो. त्यामुळे या ठिकाणी आलेले प्राणी पुन्हा दुरुस्त झाल्यानंतर देखील येतात. जे बोलतात चालतात त्यांना कळतं; मात्र या मुक्या प्राण्यांना बोलता येत नसल्यामुळे काय झालं आहे हे त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना जीव लावल्यामुळे प्राणी आपलेसे होतात. उपचार झाल्यानंतर सोडताना आमच्या मनाला दुःख देखील वाटतं आणि एकीकडे आनंद देखील वाटतो की, जेव्हा एखादा प्राणी जखमी अवस्थेत येतो तेव्हा वेगळ्या अवस्थेत असतो आणि चांगला झाल्यानंतर तो ज्यावेळेस आम्ही सोडतो त्यावेळेस तो आनंदाने उड्या मारत जंगलामध्ये निघून जातो. असे अनेक प्राणी या ठिकाणी येतात, उपचार घेतात आणि निघून जातात. -- सृष्टी सोनवणे, सर्पराज्ञी संचालिका

हेही वाचा :

  1. "...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र झाला असता"; 400 पारच्या नाऱ्यावर भाजपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य - T Raja Singh Statement
  2. आदित्य ठाकरेंची 'एनडीए' सरकारबाबत मोठी भविष्यवाणी; निवडणूक आयोगावरही हल्लाबोल - Aaditya Thackeray On NDA
  3. सलमान खानला युट्यूबवरून धमकी देणाऱ्याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी - Maharashtra politics live updates

Last Updated : Jun 16, 2024, 10:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.