ETV Bharat / state

स्वारगेट बलात्कार प्रकरण : आरोपी दत्ता गाडेवर 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर, तरुणीवर दोनदा झाला बलात्कार - PUNE BUS RAPE CASE

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील बसमध्ये तरुणीवर करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणातील नराधमावर पोलिसांनी 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलं. या नराधमानं तरुणीवर दोनदा अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे.

Pune Bus Rape Case
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2025, 11:04 AM IST

Updated : Feb 27, 2025, 12:01 PM IST

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्ह्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच बलात्कार केल्यानं राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा फरार असून त्याच्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं आहे. दत्ता गाडेनं या तरुणीवर बसमध्ये दोनदा बलात्कार केल्याचं तिच्या वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झालं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे आरोप दत्ता गाडे हा इतर प्रकरणात जामिनावर बाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Pune Bus Rape Case
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

नराधम दत्ता गाडेवर 1 लाखाचं बक्षीस जाहीर : याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या की, "13 पथकांकडून आरोपी दत्ता गाडे याचा शोध घेतला जात आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जात आहे. त्याच्या कुटुंबीयातील अनेकांची बुधवारी चौकशी करण्यात आली आहे. आरोपीला पकडण्यासाठी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांची सुद्धा बुधवारी भेट घेतली. तसेच पीडित तरुणीचा मेडिकल अहवाल प्राप्त झाला आहे. पण त्यावर बोलणं उचित नाही," असं यावेळी त्यांनी सांगितलं.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (Reporter)

दत्ता गाडेनं बसमध्ये तरुणीवर दोनदा केला बलात्कार : या प्रकरणी पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं आहे. बुधवारी संध्याकाळी ससून रुग्णालयानं पोलिसांना वैद्यकीय अहवाल दिला. त्या अहवालात आरोपी दत्ता गाडेनं दोनदा तरुणीवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :

  1. आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत, पुणे बलात्कार प्रकरणी अजितदादांचा संताप, तर सुप्रिया सुळे यांचा सरकारवर घणाघात
  2. पुणे अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुखांवर कारवाईचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश
  3. सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; तरुणीला भेटायला बोलवून चार जणांचा अत्याचार - Young Girl Sexually Assault

Last Updated : Feb 27, 2025, 12:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.