यवतमाळ PM Narendra Modi in Yavatmal : यवतमाळमध्ये आज दुपारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. मात्र सभास्थळी चक्क काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांचे स्टिकर्स खुर्चीवर लावलेले असल्यानं ही सभा नेमकी कुणाची आहे, असा सवाल उपस्थित होतेय.
सभास्थळी खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स : यवतमाळ शहरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. महिला बचत गटांच्या महिलांना मेळाव्यातून संबोधित करणार आहेत. त्यामुळं या मेळाव्याला जवळपास जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील ग्रामीण भागातून दोन लाख महिला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या ठिकाणी जिल्ह्यातील नऊ ठिकाणचं लोकार्पण ऑनलाईन पद्धतीनं केल्या जाणार आहे. मात्र या सभेत लावण्यात आलेल्या खुर्च्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्टिकर्स लावलेले असल्यानं ही सभा कोणाची, अशी चर्चा सध्या या ठिकाणी होतेय.
पीएम किसान निधीचा हप्ता होणार वितरीत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी 4:30 वाजता शहरातील नागपूर मार्गावरील डोर्ली शिवारात महिला बचत गटांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात वर्धा-कळंब या ३९ किमी ब्रॉडगेज रेल्वे लाईनसह प्रवासी रेल्वेचा शुभारंंभ होणार आहे. यासोबतच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता तसेच पीएम किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता वितरित केला जाणार आहे.
कोणत्या प्रकल्पांचं होणार लोकार्पण : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वर्धा-कळंब या नव्यानं बांधलेल्या 39 किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासह प्रवासी रेल्वेचा शुभारंभ होईल. तसंच नगर बीड परळी या रेल्वे मार्गावरील अमळनेर-आष्टी ब्रॉडगेज रेल्वे लाइन (३२ किमी) व प्रवासी रेल्वेचा शुभारंभ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तथा बळीराजा जलसंजीवनी योजना या अंतर्गत विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्राकरिता सिंचन योजनांचं लोकार्पण होईल, तसंच वरोरा-वणी राष्ट्रीय महामार्ग क्र. 930 चं चौपदरीकरण, साकोली-भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 सी प्रकल्प आणि सालई खुर्द-तिरोरा महामार्ग क्र. 753 प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे.
हेही वाचा :