ETV Bharat / state

हाताला लावलेली सलाईन काढून मनोज जरांगे थेट अंतरवालीकडं निघाले, मात्र...; संभाजीनगरात काय घडलं?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 10:31 AM IST

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांची मालिका सुरुच आहे. "गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माझं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी उपोषण सुरु असलेल्या ठिकाणाहून मंडप काढण्याचे आदेश दिले," असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय.

Etv Bharat
Etv Bharat

मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil : "गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अंतरवाली सराटी येथील माझं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं त्यांनी पोलिसांना पाठवून आमरण उपोषण सुरु असलेल्या ठिकाणचा मंडप काढण्याचे आदेश दिल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहेय. तसंच रास्ता रोकोबाबत गुन्हे दाखल केल्यामुळं आम्ही मुंबईच्या दिशेनं निघालो होतो, मात्र सामाजिक भान म्हणून आम्ही परत आलो. यांच्याच सांगण्यावरुन मी रुग्णालयात उपचार घ्यायला होकार दिला, मात्र आता ते माझं आंदोलन बंद करु पाहतात," अशी टीका देखील जरांगे पाटील यांनी केलीय.

अंतरवाली इथं पोहोचले होते पोलीस : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 17 दिवस उपोषण केल्यानंतर, त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. मात्र, त्यांना अंतरवाली येथून एक फोन आला आणि त्यात पोलीस आंदोलन स्थळावरील मंडप काढण्यासाठी आले आहेत, असं त्यांना सांगण्यात आलं. त्यावर त्यांनी संतप्त होत हाताला लावलेली सलाईन काढून अंतरवालीकडं जाण्याचा प्रयत्न केला. ते उपचार घेत असलेल्या खोलीमधून थेट बाहेर पडले आणि गाडी जवळ आले. "माझं आंदोलन कस काय बंद करु शकतात, मला संविधानानं अधिकार दिलाय आणि त्यानुसारच मी आमरण उपोषण करत आहे. तुम्ही माझं उपोषण बंद पाडू शकत नाही," असं म्हणत त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय.

पोलिसांनी काढली समजूत : उपचार घेत असलेले मनोज जरांगे रुग्णालयातून बाहेर पडताच स्थानिक पोलिसांनी याबाबत यंत्रणेला माहिती पुरवली. तर काही कार्यकर्त्यांनी जालना पोलिसांना फोन लावून देत मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणं करुन दिलं. त्यावेळी पोलिसांनी असं काही होणार नाही, असं आश्वासन दिलं. आंदोलनस्थळी असलेला मंडप आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काढू नका, अशी विनंती जरांगे पाटील यांनी पोलिसांना केली. तर पोलिसांनी देखील त्यांची समजूत काढून त्यांना शांत केलं. त्यानंतर जरांगे पाटील पुन्हा एकदा रुग्णालयाकडे मागं फिरले. "जालना पोलिसांची यात काहीही चूक नसून, गृहमंत्री जे आदेश देतात, त्याचं ते पालन करतात. देवेंद्र फडणवीस अशा गोष्टी करतात म्हणून आमचा संताप होतो," असंही जरांगे पाटील यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. मनोज जरांगे पाटलांनी कुणाची मागितली माफी? नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ
  2. मनोज जरांगे पाटलांचा बोलविता धनी शोधून काढणार; देवेंद्र फडणवीस आक्रमक
  3. 'आंदोलन संपवण्यासाठी मला मारण्याचा प्रयत्न'; मनोज जरांगे यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.