ETV Bharat / state

माजी आमदार वल्लभ बेनकेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; काका-पुतणे दोघेही राहिले उपस्थित

Ex MLA Vallabh Benke Passes Away : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय वल्लभ बेनके यांच्या अंतिमसंस्काराला राजकीय नेते मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांचाही समावेश आहे.

Ex MLA Vallabh Benke Passes Away
Ex MLA Vallabh Benke Passes Away
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 8:21 PM IST

माजी आमदार वल्लभ बेनकेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुणे Ex MLA Vallabh Benke Passes Away : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक जुणे जाणते नेतृत्व आणि पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं रविवारी (दि. 11) रात्री उशीरा निधन झालं. यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वल्लभ बेनके यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतले. त्याचबरोबर अंत्यविधीसाठी दोन्हीही नेते एकाच मंचावर आल्याचं दिसून आलं. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी अतुल बेनके यांचं सांत्वन करत वल्लभ बेनके यांना श्रद्धांजली अर्पण केली.

काय म्हणाले अजित पवार : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळं शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारं, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलंय. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झालीय."

कुटुंबावर दुःखाचा डोंगर : जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. वल्लभ बेनके हे प्रथम 1985 साली जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर 1990 मध्ये दुसऱ्यांदा ते आमदार झाले. वर्ष 2004 व 2009 मध्ये पुन्हा त्यांनी जुन्नर मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळं त्यांचा संपूर्ण पुणे जिल्ह्यात दरारा होता. कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या वल्लभ बेनके यांच्या निधनामुळं आमदार अतुल बेनके आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आमदार अतुल बेनके आणि कुटुंबीयांच्या तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. स्वर्गीय वल्लभ बेनके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

सलग सहा वेळा आमदार : वल्लभ बेनके हे सलग सहावेळा 1985 ते 2009 या कालावधीत जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले. तर, दोन वेळा विधानपरिषदेतून आमदार झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा, कुशल संघटक आणि प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वल्लभ बेनके हे शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते.

हेही वाचा :

  1. अजित पवार सत्ताधाऱ्यांत का सामील झाले ? नाव न घेता शरद पवारांनी सांगितलं कारण
  2. शिवाजी महाराजांना घडवण्यात जिजामाताचं योगदान , काही लोक चुकीचं सांगतात; शरद पवारांची योगी आदित्यनाथांवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.