ETV Bharat / state

Eknath Shinde vs Tejashwi Yadav : तेजस्वी यादवांवर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल; लीडर नाहीतर डीलर शब्दावरुन रंगल्या राजकीय चर्चा

Eknath Shinde vs Tejashwi Yadav : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर टीका केली. महाराष्ट्रात लीडर नाही, तर डीलर मंत्रिमंडळात आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. त्यावर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटानं हल्लाबोल केला आहे.

Eknath Shinde vs Tejashwi Yadav
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 12:58 PM IST

Updated : Mar 19, 2024, 2:07 PM IST

लीडर नाहीतर डीलर शब्दावरुन रंगल्या राजकीय चर्चा

मुंबई Eknath Shinde vs Tejashwi Yadav : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपावेळी झालेल्या सभेत इंडिया आघाडीच्या बहुतेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. महाराष्ट्र सरकारमधील नेते लीडर नसून डीलर असल्याचा हल्लाबोल आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला. या टीकेला शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जोरदार उत्तर देण्यात आलं आहे. मात्र कालपासून लीडर आणि डीलर शब्दावरुन दिवसभर चर्चा रंगल्या. त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल केला.

Eknath Shinde vs Tejashwi Yadav
आनंद परांजपे

आम्ही खरंच डील केली-एकनाथ शिंदे : आम्ही खरंच डीलर आहोत, कारण आम्ही डील केलीय शेतकऱ्यांच्या हितासाठी, माय भगिनींना न्याय देण्यासाठी, तरुणांना रोजगार देण्यासाठी, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी आम्ही डील केली. दुसरीकडे त्यांनी केलेली डील बघा. कुठले कुठले घोटाळे झाले, 2014 पूर्वी कोण होतं, ते त्यामध्ये दररोज रकाने भरून वृत्तपत्रातून मीडियामधून यायचे. चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, काय काय घोटाळे झाले. आता एक तरी घोटाळा दाखवा मोदी यांच्या कार्यकाळात. एक सिंगल डाग देखील त्यांना लावता आला नाही. त्यांच्याकडं आरोप करायला काही शिल्लक नसल्यामुळे खोटे आरोप करत आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 2014 साली विरोधकांनी आरोप केले त्यांचं पानिपत झालं. 2019 ला विरोध करताय त्यांचं पानिपत झालं. 2024 ला विरोध करताय, विरोधी पक्षनेता बनतील एवढे खासदार मिळतील की नाही, अशी शंका आहे, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

लोकसभेत स्पष्ट होईल कोण लीडर : भारत जोडो न्याय यात्रेचा समारोपाच्या निमित्तानं शिवतीर्थावर जाहीर सभा झाली. सभेच्या व्यासपीठावरुन इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रातील भाजपा आणि त्यांच्यासोबत असलेल्या घटक पक्षांवर निशाणा साधला होता. महाविकास आघाडीतील जे नेते भाजपासोबत गेले आणि सत्तेत बसले याविषयी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राज्यातील नेत्यांवर टीका करताना त्या नेत्यांना लीडर नाही तर डीलर म्हटलं. राज्यात जेव्हा दीड वर्षापूर्वी सत्तांतर झालं आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. महायुतीसोबत गेलेल्या सर्व नेत्यांवर वेगवेगळे आरोप विरोधकांकडून लावले जात आहेत. असाच प्रकार बिहारमध्ये घडल्यामुळे या सर्व कड्यांना जुळवत तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीत या सर्व गोष्टी स्पष्ट होतील, अशा प्रकारचं मत राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.

तेजस्वी यादव यांचे राजकीय संस्कार दिसतात-आनंद परांजपे : ज्यांच्यावर रेल्वे भरती संदर्भात सीबीआय चौकशी सुरू असून जामिनावर बाहेर आहेत, यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे हास्यास्पद आहे, असा टोला तेजस्वी यादव यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सरकार महाराष्ट्रात अत्यंत योग्य प्रकारे विकासाचे कार्य करत आहे. राजकारणात राजकीय मतभेद जरूर असावे, मात्र सत्तेत असलेले लीडर नाही तर डीलर आहेत अशा प्रकारचे वक्तव्य केल्यानं तेजस्वी यादव यांची राजकीय संस्कृती आणि संस्कार दिसून येतात, असं परांजपे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडी एकामेकांवर तोंडसुख घेणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय नेत्यांना कोण कोणत्या शब्दांच्या उपाधी दिल्या जातील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या एकामेकांवरील आरोप आणि उपरोधिक वक्तव्यांनी जनतेचं मात्र मनोरंजन होत आहे.

हेही वाचा :

  1. INDIA Rally Mumbai: 'इंडिया' आघाडीच्या सभेवरुन एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; तर नाना पटोलेंचं शिंदेंना प्रत्युत्तर
  2. RJD Leader Tejaswi Yadav: अग्निपथ योजनेवरुन तेजस्वी यादवने सरकारवर साधला निशाना
  3. INDIA Alliance Rally Mumbai : शिवाजी पार्कमधून 'इंडिया' आघाडीनं फुंकलं प्रचाराचं रणशिंग; विरोधकांचं एकच टार्गेट 'मोदी'

Last Updated : Mar 19, 2024, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.