ETV Bharat / state

डॉ. अविनाश असनारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलसचिव - Amravati University New Chancellor

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 9:36 PM IST

Amravati University New Chancellor : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलसचिव म्हणून डॉक्टर अविनाश असणारे यांची नियुक्ती करण्यात आली. आज त्यांनी पदभार स्वीकारला. ते विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते.

Amravati University New Chancellor
डॉ. अविनाश असनारे (ETV Bharat Reporter)

अमरावती Amravati University New Chancellor : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलसचिव म्हणून डॉक्टर अविनाश असणारे यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी त्यांनी आपल्या कुलसचिव पदाचा पदभार प्रभारी कुलसचिव मंगेश वरखेडे यांच्याकडून स्वीकारला.

डॉ. असनारे यांना विद्यापीठाच्या कार्याचा अनुभव : डॉ. अविनाश असणारे हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांना विद्यापीठ प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. विद्यापीठातील अनेक खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्यासाठी डॉ. अविनाश असणारे यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी घडवलेले अनेक खेळाडू आज देशभर विविध क्षेत्रात आहेत. कुलसचिव म्हणून नवी आणि महत्त्वाची जबाबदारी सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या सर्वांगीण हितासाठी माझी राहील, असं डॉक्टर अविनाश असणारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे. अमरावती शहरातील साहित्य, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील डॉ. अविनाश असणारे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

विद्यापीठातील नवे फेरबदल : कुलसचिव म्हणून प्राध्यापक डॉ. अविनाश असणारे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला असतानाच परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदी विद्यापीठाचे प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी यांची निवड झाली आहे. नव संशोधन नवोपक्रम व सहचार्य मंडळाच्या संचालक पदी डॉ. अजय लाड आणि वित्त व लेखा अधिकारी म्हणून आय आय एम नागपूरचे सहाय्यक व्यवस्थापक डॉ. पुष्कर देशपांडे यांची निवड झाली आहे. या नव्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते प्र कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे तसेच विविध प्राधिकरणींचे सदस्य विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख अधिकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्यासह नवनियुक्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा:

  1. मुंबई, संभाजीनगरासह राज्यात ठिकठिकाणी रामोजी राव यांना श्रद्धांजली; तर नागपुरात जगप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी आदरांजलीच्या प्रसादासाठी केला हलवा - Tribute to Ramoji Rao
  2. १४ कोटी रुपयांचं गव्हर्मेंट शेअर्स फसवणूक प्रकरण; आरोपीच्या कोलकात्यातून आवळल्या मुसक्या - Government Shares Case
  3. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतांवर सर्वच पक्षांचा डोळा: उद्धव ठाकरेंचं पारडं जड, समाजवादी पक्षाच्या आशाही उंचावल्या - Assembly Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.