रावळपिंडी PAK vs BAN 9th Match Live Streaming : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा नववा सामना आज 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता रावळपिंडीमधील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे आणि दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत या सामन्याचा विशेष परिणाम होणार नाही.
Dhaka Premier Division Cricket League preparations are in full swing as teams gear up for the tournament.#BCB #Cricket #BDCricket #DPL2025 pic.twitter.com/G1FgggSVr4
— Bangladesh Cricket (@BCBtigers) February 26, 2025
पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान-बांगलादेशची खराब कामगिरी : चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या स्पर्धेत चुकांना फार कमी जागा असते. पण यजमान पाकिस्ताननं पहिल्या दोन सामन्यांमध्ये खराब फॉर्म दाखवला आणि न्यूझीलंड आणि भारताकडून दारुण पराभव पत्करल्यानंतर, घरच्या मैदानावर चॅम्पियन होण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं. बांगलादेशचीही तीच अवस्था होती, ज्यामुळं या दोन्ही संघांमधील सामना केवळ औपचारिकता राहिला. आता या सामन्यात दोन्ही संघ प्रतिष्ठेसाठी एकमेकांसमोर येतील.
रावळपिंडीची खेळपट्टी कशी असेल : पाकिस्तान आणि बांगलादेश सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. जिथं फलंदाजांकडून चांगली कामगिरी अपेक्षित असते. या मैदानावर नवीन चेंडू वापरताना वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. पण एकदा फलंदाज स्थिरावला की तो मोठी खेळी खेळू शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
India win the match by six wickets.#PAKvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/woTMIH4M8n
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 23, 2025
हेड-टू-हेड रेकॉर्ड : वनडे सामन्यांमध्ये पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील हेड-टू-हेड सामन्यांच्या रेकॉर्डनुसार, पाकिस्ताननं या स्पर्धेत पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आहे. आतापर्यंतची स्पर्धा मोठ्या प्रमाणात एकतर्फी राहिली आहे असे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 39 वनडे सामने खेळले आहेत आणि त्यापैकी पाकिस्ताननं 34 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, बांगलादेशनं आतापर्यंत फक्त 5 वनडे सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं आहे. घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानचा रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. पाकिस्ताननं बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर खेळलेले सर्व 12 वनडे सामने जिंकले आहेत. आगामी सामना जिंकून त्यांचा अपराजित विजयाचा सिलसिला सुरु ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
पाकिस्तान सलग तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या गट फेरीतून बाहेर : पाकिस्तान 29 वर्षांनंतर जागतिक स्पर्धेचं आयोजन करत आहे. पण संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता देशाच्या क्रिकेट रचनेत आमूलाग्र बदल करण्याची मागणी होत आहे. जागतिक मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पाकिस्तानला बाहेर पडण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. यापूर्वी, 2023 मध्ये झालेल्या वनडे विश्वचषक आणि 2024 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तान संघ पहिल्या फेरीच्या पुढे प्रगती करु शकला नाही.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा नववा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा नववा सामना 27 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी रावळपिंडीच्या रावळपिंडी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक दुपारी 02:00 वाजता होईल.
INTO THE SEMIS 🤩
— ICC (@ICC) February 24, 2025
A third-successive final-four appearance for India at the #ChampionsTrophy 👏 pic.twitter.com/N8kR0rhRMy
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा नववा सामना कुठं आणि कसा पहावा?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे भारतात अधिकृत प्रसारण हक्क जिओस्टार नेटवर्ककडे आहेत. चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध प्रादेशिक भाषांमध्ये पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय, डिजिटल स्ट्रीमिंगचे अधिकार देखील जिओस्टार नेटवर्ककडे आहेत आणि सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर फ्रीमध्ये उपलब्ध असेल.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत:
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आघा (उपकर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.
बांगलादेश : नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्झिद, हसन, तौहिद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मोहम्मद महमुदुल्लाह, झाकीर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तन्झिम हसन साकिब, नाहिद राणा.
हेही वाचा :