रावळपिंडी PAK vs BAN 9th Match Live : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात ग्रुप बी मधील यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश क्रिकेट संघात होणार होता. पाकिस्तानी संघानं आतापर्यंत दोन्ही सामने गमावले आहेत. आता त्यांचा शेवटचा गट सामना बांगलादेशशी होता. मात्र पावसानं हा सामना रद्द झाला आहे. तथापि, या सामन्याला कोणतंही महत्त्व नव्हतं, कारण हे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
Rain plays spoilsport as #PAKvBAN is called-off in Rawalpindi ⛈️
— ICC (@ICC) February 27, 2025
More ➡️ https://t.co/sH1r63WCCD pic.twitter.com/hFe6ETayTG
पावसामुळं सामना रद्द : मात्र आणखी एक गोष्ट या सामन्याला खास बनवते. ती म्हणजे पाकिस्तानची कामगिरी. पाकिस्तानी संघाला या सामन्यात विजय मिळवून आपला सन्मान वाचवायचा होता. पण कोणताही सामना न जिंकता त्यांना स्पर्धेतून बाहेर पडाव लागलं आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे रावळपिंडीचं हवामान. सध्या याठिकाणी जोरदार पाऊस सुरु असल्यानं हा सामना नाणेफेकीशिवाय रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला.
Rain has delayed the toss ahead of the #PAKvBAN clash in Rawalpindi 🌧️#ChampionsTrophy
— ICC (@ICC) February 27, 2025
LIVE UPDATES ⬇️https://t.co/sH1r63WCCD
हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये पाकिस्तानचा वरचष्मा : या स्पर्धेत पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही संघ अजूनही विजयासाठी संघर्ष करत आहेत. पण जर आपण मागील रेकॉर्ड्स पाहिले तर पाकिस्तानचा वरचष्मा असल्याचं दिसून येतं. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 39 वनडे सामने खेळले गेले आहेत, ज्यात पाकिस्ताननं 34 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला फक्त 5 सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे.
Which team ends their #ChampionsTrophy campaign with a win in Rawalpindi? 🤔
— ICC (@ICC) February 27, 2025
How to watch 👉 https://t.co/S0poKnxpTX pic.twitter.com/vo3KRXPcFB
पाकिस्तानला बसेल पराभवाचा धक्का : तसंच गेल्या 5 सामन्यांमध्ये पाकिस्ताननं 4 सामने जिंकले आहेत तर बांगलादेशनं फक्त 1 सामना जिंकला आहे. परंतु पाकिस्तानचा अलिकडचा फॉर्म तितकासा चांगला राहिलेला नाही. त्याच वेळी, बांगलादेश संघ किमान त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना कडक टक्कर देत असल्याचं दिसतं. अशा परिस्थितीत, जर पावसानं व्यत्यय आणला नाही आणि सामना झाला, तर ते त्यांच्या कामगिरीनं पाकिस्तानला धक्का देऊ शकतात.
The start of Pakistan 🆚 Bangladesh match is delayed due to rain 🌧️ #PAKvBAN | #ChampionsTrophy pic.twitter.com/T4YZaB8PVt
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 27, 2025
सामन्यासाठी दोन्ही संघ :
पाकिस्तान : इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान अली आघा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.
बांगलादेश : तन्जीद हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, तौहिद हृदया, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, झाकीर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, नाहिद राणा.
हेही वाचा :