ETV Bharat / spiritual

‘या’दोन राशींचे खुलणार भाग्य अन् करिअरमध्ये मिळणार नव्या संधी; कसा असेल जुलै महिन्याचा पहिला दिवस? - Horoscope 01 July 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 3:41 AM IST

Horoscope 01 July 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 01 July 2024
राशी भविष्य 2024 (Etv Bharat File Photo)

  • मेष (ARIES) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सगळ्या कामात यश मिळाल्यानं आपण खूप आनंदी व प्रसन्न व्हाल. आर्थिक लाभ सुद्धा होईल. मित्र व सगे-सोयरे ह्यांच्या भेटीनं घरातील वातावरण आनंदी होईल. उत्तम कपडे, भोजन प्राप्ती होईल. मित्र व शुभेच्छुक ह्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्यानं आपण आनंदित व्हाल.
  • वृषभ (TAURUS ): आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज सावध राहावं लागेल. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. स्नेही व कुटुंबीय ह्यांच्याशी मतभेद झाल्याने आपण दुःखी व्हाल. आपण सुरू केलेले काम अपूर्ण राहील. खर्च वाढेल. कष्टाचे योग्य फळ न मिळाल्यानं मन निराश होईल. अविचाराने घेतलेल्या निर्णयानं गैरसमज निर्माण होतील.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळं हर्षोल्हास वाढेल. पत्नी व संततीकडून फायदेशीर बातमी मिळेल. मित्रांशी संवाद साधल्यानं आनंद मिळेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता येईल.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस व्यवसायाच्यादृष्टीनं लाभदायक आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता आहे. कुटुंबात महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आईची तब्बेत उत्तम राहील. धन-संपत्ति, मान-सन्मानाची प्राप्ती होईल. घराच्या सजावटीत फेरबदल कराल. दिवसभराच्या कामामुळं थकवा जाणवेल. प्रकृती उत्तम राहील. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.
  • सिंह (LEO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात अडचणी येतील व वरिष्ठ नाराज झाल्याने तुम्हाला दुःख होण्याची शक्यता आहे. प्रकृती साधारण राहील.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणं हितावह राहील. आज आपला क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. स्नेही व कुटुंबीयांशी जोराचे वाद झाल्यानं आपण दुःखी व्हाल. शक्यतो प्रवास टाळा. हितशत्रूपासून सावध राहा.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज आपले मन मित्रांसह खाणं-पिणं, फिरावयास जाणं तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळं आनंदी राहील. एखादी सहल संभवते. मनोरंजनाची साधने व वस्त्रालंकार यांची खरेदी होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मान-सन्मान संभवतात.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस सौख्यदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता अनुभवाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. स्त्रीयांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल. धनलाभ होईल. अपूर्ण कामे तडीस जातील.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपणास रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्यानं निराशा येण्याची शक्यता आहे. वाड्मय किंवा अन्य सृजनशील कलेप्रती आस्था राहील. संततीविषयक चिंता राहिल्यानं मन बेचैन होईल. शक्यतो आज प्रवास टाळावा.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज आपणास प्रतिकूलतेस तोंड द्यावं लागेल. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल. सार्वजनिक जीवनात अपयश, अपकीर्ती होईल किंवा मान-प्रतिष्ठेची हानी होईल. पुरेशी विश्रांती व झोप न मिळाल्यानं आरोग्य बिघडेल. उत्साह व स्फूर्ती राहणार नाही. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी व भावंडांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. स्नेहीजन घरी आल्यानं आनंद वाटेल. प्रवासाची शक्यता आहे.
  • मीन (PISCES) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज खर्च, संताप व जीभ यावर संयम ठेवावा लागेल. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार व पैश्यांच्या देवाण-घेवाणीत सावध राहावं. कुटुंबियांशी भांडण होईल. नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. खाण्या- पिण्याच्या बेपर्वाहीमुळं आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.