ETV Bharat / politics

नवाब भाई आहेत कुठं...? अजित पवारांच्या 'देवगिरी'वर काय घडलं? - Nawab Malik

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 4:52 PM IST

Updated : Jul 3, 2024, 5:11 PM IST

Nawab Malik : मंगळवारी रात्री अजित पवार यांच्या देवगिरी निवास्थानी झालेल्या पक्षाच्या बैठकीला नवाब मलिक यांनी हजेरी लावल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यावर आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Nawab Malik
नवाब मलिक (ETV Bharat Reporter)

मुंबई Nawab Malik : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केल्यानंतर ईडीच्या माध्यमातून नवाब मलिक यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महायुतीसरकारमध्ये अजित पवार सहभागी झाले. आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवाब मलिक यांची आठवण झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामुळं नवाब मलिक आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर दिसायचं. मात्र, मंगळवारी रात्री नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या देवगिरी निवास्थानी पक्षाच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यावर आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक नेमके आहेत कुठं यावर राजकीय विश्लेषकांची प्रतिक्रिया काय ते बघूया.

नवाब मलिक नेमके आहेत कुठं (ETV Bharat Reporter)

नवाब मलिक नेमके कुठं, कोणी सांगायला तयार नाही : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक ईडी कोठडीत होते. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या काळात नेमके ते कोठडीतून बाहेर आले. त्यानंतर मलिक यांनी नागपूर येथील अधिवेशनाला हजेरी लावत सत्ताधारी बाकावर बसले आणि आपण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असल्याचा संदेश दिला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राच्या माध्यमातून मलिक यांचा सत्ताधारी गटात समावेशावर नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप असलेल्या नवाब मलिकांना महायुतीचा भाग करणं योग्य नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अधिवेशनात नवाब मालिक दिसले नाहीत. नवाब मालिक कोणत्या गटाकडे आहेत, यावर आपल्याला माहिती नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. तर नवाब मालिक नेमकं कोणत्या गटाकडे या प्रश्नाचं उत्तर त्यावेळी देखील आणि त्यानंतर देखील राष्ट्रवादीचे नेते नवाब मालिक यांनी दिलं नव्हतं. सत्ताधारी भाजपाच्या दबावामुळंच आपल्या ज्येष्ठ नेत्याला दूर ठेवावं लागल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.

जितेंद्र आव्हाड (ETV Bharat Reporter)

नवाब मलिक कोणासोबत स्पष्ट झालं - जितेंद्र आव्हाड : याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, नवाब मलिक यांचा पाठिंबा कोणाला आहे, हे कुणालाच कळलं नाही. मात्र नवाब मलिक कुणासोबत आहेत ते कालच्या बैठकीत स्पष्ट झालं. त्यामुळं ते युतीसोबत आहेत हे स्पष्ट झालं आहे." तसंच त्यांचा फायदा घेतला जातोय का, हे त्यांनी ओळखायला हवं असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. मात्र महायुती कोणाची हाकालपट्टी करतात ते पाहावे लागेल, असंही आव्हाड म्हणाले.

तुम्हाला काही त्रास-अजित पवार : अजित पवारांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला ज्येष्ठ नेते नवाब मालिक यांनी हजेरी लावली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, "तुम्हाला काही त्रास होतोय का?" असं उत्तर अजित पवार यांच्याकडून पत्रकारांना देण्यात आलं.

मारल्यासारखं आणि रडल्या सारखं... : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक नेमके कोणत्या गटाकडे हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र नवाब मालिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्यामुळं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत म्हणजेच अजित पवार यांच्यासोबत असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यातच काही दिवसांनी पार पडणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी नवाब मलिक यांचं एक मत फार महत्त्वाचं आहे. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नवाब मलिक यांना नाराज करुन मुस्लिम मतदारांना नाराज करणं हे महायुतीला परवडणार नाही. मुस्लिम मतदारांचा फटका लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. त्यामुळं सध्याची परिस्थिती अशी आहे की, मी रागवतो तू गप्प बस अर्थात तू शांत बस अशा प्रकारची पद्धत नवाब मलिक आणि महायुतीत पाहायला मिळत असल्याचं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं.

नवाब मलिकांचं मत कोणाला : या महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील दोन बाद झाले. त्यामुळं विधान परिषद निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचं ठरणार आहे. महायुतीच्या जागा जास्तीत जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक नेमके कोणत्या गटाकडे आहेत, या प्रश्नापेक्षा नवाब मलिकांचं मत महायुतीसाठी किती महत्त्वाचं आहे याचा विचार करता नवाब मलिकांना पूर्वीसारखा भाजपाकडून थेट विरोध केला जाणार नसल्याचं समजत आहे. त्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच नवाब मलिक आहेत यावर केव्हा शिक्कामोर्तब होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांचा अर्ज - Vidhan Parishad Election 2024
  2. शिवीगाळ प्रकरण तापलं; 'निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत...', प्रसाद लाड यांचा इशारा - Maharashtra Assembly Session 2024

Last Updated : Jul 3, 2024, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.