ETV Bharat / politics

'अकेला देवेंद्र कुछ भी नही कर सकता'; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ambadas Danve On Devendra Fadnavis : आज अंबादास दानवे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांवर टीका केली.

Ambadas Danve On Devendra Fadnavis
अंबादास दानवे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 2:30 PM IST

प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

कोल्हापूर Ambadas Danve On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती काहीही राहिलेलं नाही, त्यांच्या हातातून सर्व काही निघून गेलं आहे. ते सुद्धा हतबल झाले आहेत. 'अकेला देवेंद्र कुछ भी कर नही सकता, अकेले देवेंद्र के हाथ में भाजपाने महाराष्ट्र में कुछ भी रखा नही है' अशी टीका, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य : करवीर निवासिनी अंबाबाई ही शक्ती देवता आणि ऊर्जेची देवता आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला ऊर्जा दिली. महाराष्ट्रात अलिकडच्या काळात जन्मलेल्या महिषासुराचं निर्दालन करण्याची शक्ती दे अशा आशयाची प्रार्थना अंबाबाईची चरणी त्यांनी केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा देण्याची धमक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाही, त्यांना इशारा द्यायचा असता तर ते समोरासमोर येऊन बोलले असते. गद्दार लोकांना नाक नसतं आणि तोंडही नसतं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.

राष्ट्रवादीपक्षाबाबत अंपायर फिक्स होते : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं देण्याच्या निर्णयात अंपायर वगैरे सगळं ठरलं होतं. केवळ हात कधी वर करायचा बाकी होतं, तो त्यांनी परवा केला. जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं ते जगाला आणि राज्याला माहिती आहे. तशी राष्ट्रवादी काँग्रेस ही कोणाची आहे सर्वांना माहीत आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी असताना बहुमताच्या जोरावर अशा पद्धतीचा निकाल दिला. लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवण्यात आली आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात काम करणारा नोकर झाला असल्याची घणाघाती टीका, दानवे यांनी केली.

शासन आपल्या दारी कार्यक्रम बोगस : 'शासन आपल्या दारी' हे केवळ सरकारी यंत्रणा आणि जाहिरातींचा वापर करून केलेली शो बाजी आहे. राज्यात अनेक ठिकाणी जनता दरबार घेत आहे. शासनाचा 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम केवळ बोगस आहे. मागच्या पोटनिवडणुकीत अनेक गुंडांना पॅरोलवर सोडण्यात आलं होतं, गुंडांचं राज्य या महाराष्ट्रात आहे. भाजपा आणि शिंदे गटाचे आमदार गोळीबार करत आहेत, कारवाई काय होत आहे? ठाणे भिवंडी या भागामध्ये जमीन हडपणे आणि नावावर करून घेणे असे प्रकार सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहेत. ठिकठिकाणी सरकारकडून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडांना आश्रय दिला जात आहे. पोलीस सुद्धा सरकारच्या हातंचा बाहुलं बनला असल्याचं दानवे म्हणाले.

हेही वाचा -

  1. ईव्हीएम मशीन चोरी प्रकरण: निवडणूक आयोगाचा दणका, तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन
  2. तहसीलदार कार्यालयातून चोरली ईव्हीएम मशीन; पाहा सीसीटीव्ही
  3. ईव्हीएम मशीन चोरणाऱ्यांवर कारवाई होणार- मुख्य निवडणूक अधिकारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.